वारकरी संप्रदायातील सेवाव्रत व्यक्तिमत्व:युवराज एकनाथ पाटील यांना जीवन गौरव पुरस्कार – 2024 प्रदान .

युवराज एकनाथ पाटील यांनी त्यांच्या निःस्वार्थ आध्यात्मिक व सामाजिक कार्यातून समाजाला प्रेरणा दिली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत आळंदी क्षेत्री श्रीसंत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळा कार्यक्रमात त्यांना जीवन गौरव पुरस्कार – 2024 प्रदान करण्यात आला. हा सन्मान आत्मोन्नती आणि विश्वशांती भारतीय श्रीगुरूभक्त स्वानंद प्रेमळ मंडळ आनंदाश्रम, आळंदी देवाची यांच्या वतीने करण्यात आला आहे.थोडक्यात जीवन प्रवास युवराज पाटील हे मूळ थोरगव्हाण, ता. रावेर, जि. जळगाव येथील चुनवाडेकर पाटील घराण्यातील आहेत. त्यांचा जन्म 27 सप्टेंबर 1960 रोजी कापुसवाडी, ता. जामनेर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कै. एकनाथ व्यंकटेश पाटील असून ते शिक्षक होते. श्री पाटील यांचे प्राथमिक शिक्षण वडिलांच्या बदल्या निमित्त वेगवेगळ्या ठिकाणी झाले. माध्यमिक शिक्षण डी.एस. देशमुख हायस्कूल थोरगव्हाण ता रावेर येथे झाले. याच काळात त्यांनी नाथ संप्रदायाचा अनुग्रह घेतला व आध्यात्मिक कार्याची सुरुवात केली.


नोकरी व आध्यात्मिक जीवनाची सुरुवातयुवराज पाटील यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत नोकरी स्वीकारून आपल्या कर्तृत्वाचा प्रवास सुरू केला. कल्याण येथे त्यांना ह.भ.प. बिभीषण बाबा ठाकूर (सोनारपाडा) यांच्या माध्यमातून आनंद संप्रदाय आणि त्याचे मुख्य गुरुवर्य संत श्रीपादबाबा चव्हाण व संत रामदास बाबा बुधवारे यांचे मार्गदर्शन लाभले. यानंतर त्यांनी पूर्णतःस्वतःला सामाजिक व अध्यात्मिक कार्यासाठी झोकून दिले.कार्यक्षेत्रातील योगदान म्हणजे तळागाळातील दुर्बल, व्यसनाधीन व समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहिलेल्या लोकांना सोबत घेऊन नामसंकीर्तनाचे महत्व पटवून दिले. त्यांनी अनेकांना व्यसनमुक्त करून त्यांचे जीवन सुधारले. दरवर्षी देहू, आळंदी, पंढरपूर यात्रांचे आयोजन करणे, तसेच वैष्णव मेळावे यशस्वीपणे पार पाडणे हे त्यांचे नियमित कार्य आहे. यांच्या निःस्वार्थ सेवाव्रत कार्यामुळे आळंदी क्षेत्री श्री संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्यात त्यांना जीवन गौरव पुरस्कार – 2024 ने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान आनंद संप्रदायातील सर्वसंतांच्या आशीर्वादाचे प्रतीक आहे.समाजसेवा आणि नामस्मरण हाच आपला मार्ग आहे,” असे सांगत त्यांनी समाजाला प्रेरणा दिली आहे .

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.