शहरातील मूकबधिर बांधवांचे डॉ.अनुज पाटील यांना समर्थन.

आमच्या स्वप्नांचा आवाज मूक आहे, पण आमचे समर्थन स्पष्ट.. शहरातील मूकबधिर बांधवांचे डॉ.अनुज पाटील यांना समर्थन शहरातील मूकबधिर बांधवांनी मनसेचे उमेदवार डॉ. अनुज पाटील यांना आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांच्या हातवाऱ्यांच्या भाषेत दिलेल्या या आव्हानातून त्यांचे मनोगत आणि समर्थन स्पष्ट झाले आहे. मूकबधिर बांधवांनी “इंजिन” चिन्हाला मतदान करण्याचा निर्धार केला आहे.

आमच्या स्वप्नांचा आवाज मूक आहे, पण आमचे समर्थन स्पष्ट आहे. आम्हाला हक्कांची, न्यायाची गरज आहे, आणि त्यासाठी आम्हाला डॉ. अनुज पाटील यांच्यासारख्या उमेदवाराचा आधार हवा आहे.” तसेच, त्यांनी मनसेच्या चिन्हाचं-“इंजिन” – विशेषतः उल्लेख करून सांगितले आहे की, “इंजिन” हे त्यांना पुढे नेणारे आणि त्यांच्या प्रगतीचे प्रतीक आहे दरम्यान डॉ. अनुज पाटील यांनी जळगाव शहरातील मूकबधिर बांधवांसाठी विशेष सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्या मते, मूकबधिर बांधवांसमोरील अडचणी दूर करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे, आणि त्यासाठी खास सेवा, योजना व प्रकल्प राबवले जातील.

मूकबधिर बांधवांसाठी शिक्षण, रोजगार व आरोग्याच्या सुविधा सहज उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यामध्ये संवादाच्या अडचणी दूर करण्यासाठी ‘साइन लँग्वेज’द्वारे विशेष सहाय्यकांची नेमणूक केली जाईल. याशिवाय, मूकबधिरांसाठी विशेष कार्यशाळा, मार्गदर्शन शिबिरे, आणि शासकीय योजनांची संपूर्ण माहिती देणारे केंद्र स्थापन करण्याची योजना आहे. तसेच मूकबधिर बांधवांसाठी हेल्पलाइन सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे, ज्याद्वारे त्यांना त्वरित मदत आणि सल्ला मिळू शकेल. पोस्टच्या शेवटी डॉ. पाटील यांनी मूकबधिर बांधवांच्या सशक्तिकरणासाठी पूर्णपणे समर्पित असल्याचे नमूद केले आहे.

  • Related Posts

    कर्जबाजारी जावयाचा सासऱ्याच्या तिजोरीवर डल्ला, 28 लाखांचा ऐवज लांबवला

    कर्जबाजारी जावयाचा सासऱ्याच्या तिजोरीवर डल्ला, 28 लाखांचा ऐवज लांबवला जळगाव | भुसावळ येथील सोमनाथ नगर शिवशक्ती कॉलनी या ठिकाणी राहणाऱ्या अनिल हरी ब-हाटे यांच्या घरात लोखंडाची खिडकी तोडून 33 तोळ्याचे…

    तापी पाटबंधारे विभागाच्या निवृत्त अभियंत्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा

    तापी पाटबंधारे विभागाच्या निवृत्त अभियंत्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा जळगाव : सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधीतून शेततळ्याचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून कंत्राटदाराची तापी पाटबंधारे विभागाचे तत्कालिन वरिष्ठ अभियंता व्ही. डी. पाटील…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    उपाशीपोटी झोपलेल्या चिमुकल्यांचा काळाने घेतला घास; मद्यधुंद डंपर चालक ठरला वैरी.

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    महारेराची नागपुरात मोठी कारवाई; ५४८ प्रकल्पांना नोटीस, ३० दिवसांत प्रतिसाद न दिल्यास नोंदणी रद्द

    दुचाकीला कारची भीषण धडक, पती-पत्नी रस्त्यावर पडले अन् साता जन्माची साथ सुटली

    दुचाकीला कारची भीषण धडक, पती-पत्नी रस्त्यावर पडले अन् साता जन्माची साथ सुटली

    दुर्दैवी! मोठ्या आवाजात गाणे ऐकण्याच्या नादात पिकअप चालकाने ३ वर्षीय मुलाला चिरडले.

    दुर्दैवी! मोठ्या आवाजात गाणे ऐकण्याच्या नादात पिकअप चालकाने ३ वर्षीय मुलाला चिरडले.

    चंद्रपूर जिल्हा बँक परीक्षेत डमी परीक्षार्थी? विद्यार्थ्यांचा संताप, पोलिस आले अन् तोतया विद्यार्थी पसार!

    चंद्रपूर जिल्हा बँक परीक्षेत डमी परीक्षार्थी? विद्यार्थ्यांचा संताप, पोलिस आले अन् तोतया विद्यार्थी पसार!