दुचाकीला कारची भीषण धडक, पती-पत्नी रस्त्यावर पडले अन् साता जन्माची साथ सुटली

सिंधुदुर्गात भीषण अपघात झाला असून कार आणि दुचाकीच्या धडकेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ येथे भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दुचाकी घेऊन जाणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला आहे. कुडाळ येथे एका कार्यक्रमासाठी जात असताना दुचाकीला समोरुन येणाऱ्या कारची जोरदार धडक बसली. हा अपघात मुंबई-गोवा महामार्गावरील भंगसाळ नदीच्या पुलावर झाल्याची माहिती आहे. या अपघातात दुचाकीवरून जाणाऱ्या वसुंधरा जनार्दन मांजरेकर या गंभीर जखमी झाल्या होत्या. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कार चालक वरुण आनंद दामले (राहणार डोंबिवली पूर्व) यांच्याविरुद्ध कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे ब्राह्मणवाडी येथील जनार्दन बापू मांजरेकर आणि त्यांची पत्नी वसुंधरा मांजरेकर हे दोघेही कुडाळ एमआयडीसी येथील बॅ. नाथ पै विद्यालय येथे असलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जात होते. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ते कार्यक्रमासाठी जात होते. ते दोघे (एमएच ०७ एए ६८३१) स्कुटर घेऊन कार्यक्रम स्थळी जात होते. त्यांची स्कुटर भंगसाळ नदीच्या पुलावरून पुढच्या दिशेने कुडाळ शहर सर्विस रस्त्याच्या दिशेने येत असताना मुंबई ते गोवा या दिशेने जाणाऱ्या अल्टो कार क्रमांक (एमएच ०५ एफबी ९७१३) या गाडीचे चालक वरुण आनंद दामले यांनी स्कूटरला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये जनार्दन मांजरेकर आणि वसुंधरा मांजरेकर हे दाम्पत्य रस्त्यावर पडले. त्यामध्ये दोघेही जखमी झाले. दरम्यान, कारचालक वरुण दामले यांनी आपल्या कारमध्ये बसवून त्यांना कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र, इथे उपचार होत नसल्यामुळे त्यांना ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले. हे उपचार सुरू असताना वसुंधरा मांजरेकर यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताबाबत तिचे पती जनार्दन मांजरेकर यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात खबर दिली असून त्यानुसार कार चालक वरुण दामले यांच्याविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे. सध्या पुढील तपास सुरु आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..