मध्यप्रदेशातून मन सुन्न करणारी दुर्दैवी घटना समोर आली आहे. पिकअप वाहनाने गाणे ऐकण्याच्या नादात ३ वर्षीय चिमुकल्याला वाहनानखाली चिरडले आहे. मध्यप्रदेशातून मन सुन्न करणारी दुर्दैवी घटना समोर आली आहे. पिकअप वाहनाने गाणे ऐकण्याच्या नादात ३ वर्षीय चिमुकल्याला वाहनानखाली चिरडले आहे. अपघात घडला त्याक्षणी वाहनचालकाने मोठ्या आवाजात म्युझिक सिस्टम लावले होते. त्यामुळे त्याला रस्त्यावरील लोकांचे आवाज ऐकू येत नव्हते. ज्यामध्ये चिमुकला चाकाखाली आला आणि त्याने जागीच प्राण गमावला. बलवारा पोलीस स्टेशनचे प्रभारी अनिल बामनिया यांच्या माहितीनुसार, पिकअप वाहनचालक आनंद याला आज ३ वर्षांच्या मुलाला वाहनाखाली चिरडल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी संध्याकाळी अर्जुन पिकअप वाहनातून कटकूट पोलीस ठाणे हद्दीतील बडेल गावात भाजीपाला उत्पादक मोहन यांच्या शेतात भाजी पुरवण्यासाठी गेला होता.










