अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड-तेल्हारा राज्य मार्गावर भीषण अपघात घडला आहे. लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटून भीषण अपघात घडला आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड-तेल्हारा राज्य मार्गावर भीषण अपघात घडला आहे. हिवरखेड ते गोर्धादरम्यान पंचमुखी हनुमान मंदिराजवळ लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यांची कार पलटून भीषण अपघात घडला आहे. सदर कारमध्ये माटरगाव येथील कुटुंब आणि अन्य ५ जण असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहे. यामधील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.










