वाढदिवसाच्या पार्टीत अंदाधुंद गोळीबार, तिघांचा मृत्यू, मोठी खळबळ

एका हॉटेलमध्ये वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान झालेल्या गोळीबारात तीन तरुणांचा मृत्यू झाला. रात्री दोनच्या सुमारास झालेल्या या गोळीबारात आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिस आता याप्रकरणी तपास करत आहेत. वाढदिवसाच्या पार्टीत गोळीबार झाल्याने मोठी खळबळ निर्माण झालीये.  एक धक्कादायक प्रकार पुढे येताना दिसतोय. या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाली असून शहरात भीतीचे वातावरण बघायला मिळतंय. एकीकडे बर्थडे पार्टी सुरू होती. सर्वजण आपल्या आनंदात होते. मात्र, पुढे जे काही घडले त्याचा विचारही साधा कोणी केला नसावा. चक्क बर्थडे पार्टी सुरू असताना गोळीबार करण्यात आला. त्यापेक्षाही हैराण करणारे म्हणजे या गोळीबारात तब्बल 3 जणांचा जागीच मृत्यू झालाय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. जखमींना रूग्णालयात दाखल केले. याप्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून केला जातोय.

बर्थडे पार्टी सुरू असताना अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. गोळीबार करून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांकडून आता आरोपीचा शोध घेतला जातोय. या गोळीबारातील मृतांमध्ये दोन तरूण आणि एका तरूणीचा देखील समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही गोळीबाराची घटना रात्री दोनच्या दरम्यानची आहे. हरियाणा पंचकूला येथील पिंजाैर हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. गोळीबारात मृत पावलेल्यांची नावे विनीत, विक्की आणि मुलीचे नाव निया असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलीये. हे सर्वजण हिसारचे रहिवासी असून ते बर्थडेसाठी पंचकूलामध्ये आल्याची माहिती मिळतंय. हा गोळीबार नेमका का करण्यात आला, याचा शोध पोलिस घेत आहेत. प्राथमिक माहितीनुसार गॅंगवॉरच्या माध्यमातून हा गोळीबार करण्यात आला असावा. या गोळीबारानंतर शहरात विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण बघायला मिळतंय. मृतांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी देखील कुटुंबियांकडून केली जात आहे. या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिस घटनास्थळीच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासताना दिसत आहेत. किती आरोपींकडून हा गोळीबार करण्यात आला, याची माहिती अजून मिळू शकली नाहीये.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..