ट्रकचे ब्रेक फेल, जोरदार धडक अन् कंटेनर उलटला; चालक-सहचालक कॅबिनमध्ये दबले, भयानक अंत

ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने त्याने एका कंटेनरला भीषण धडक दिली. या अपघातात दोघांचा अत्यंत भयावह असा अंत झाला आहे. या घटनेने मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर काही वेळ वाहतूक खोळंबली होती. शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथील चारणपाडा जवळ मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला आहे. गतिरोधकावर ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने ट्रकने कंटेनरला मागून धडक दिली, ही धडक इतकी भीषण होती की कंटेनर रस्त्यावर उलटला आणि हा अपघात झाला. या अपघातात ट्रकमधील मनोज जाटव (वय २७ रा. जालापुर ग्वालियर) यांच्यासह २ दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून मध्य प्रदेशकडून महाराष्ट्रात येणाऱ्या लेनवर तालुक्यातील पळासनेर येथील चारणपाडा जवळ गतिरोधकावर ब्रेक फेल झाला आणि भरधाव वेगात असलेली आरजे ११ जीबी ०८८६ क्रमांकाच्या प्लायवूडने भरलेल्या ट्रकने पुढे चालणाऱ्या एचआर- ४७ डी-०७२१ क्रमांकाच्या कंटेनरला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की काही अंतरापर्यंत रस्त्यावर कंटेनरला घसरून नेले. त्यामुळे कंटेनर रस्त्यावर पलटी झाला. तर ट्रकमधील चालक आणि सहचालक दोघेही कॅबिनमध्ये दाबले गेल्याने दोघांचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी धाव घेत मदत कार्य सुरू केले. तसेच, क्रेनच्या सहाय्याने उलटलेला कंटेनर रस्त्यावरून बाजूला करीत वाहतूक मोकळी केली. तसेच, महामार्ग रुग्णवाहिकेने मनोज जाटव यांचा मृतदेह सकाळी सात वाजेच्या सुमारास रुग्णालयात दाखल करण्यात आला. तर, ट्रकच्या कॅबिनमध्ये अडकलेल्या दुसऱ्या अनोळखी मृतदेहाला बाहेर काढून सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास महामार्ग रुग्णवाहिकेने रुग्णालयात दाखल करण्यात आला. पुढील कारवाईही तालुका पोलीस करीत आहे. तर, अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड तेल्हारा राज्य मार्गावर हिवरखेड ते गोर्धा दरम्यान पंचमुखी हनुमान मंदिराजवळ कार पलटून भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. कारमध्ये माटरगाव येथील ५ जण असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघातातील एक जण दगावल्याची आणि अन्य चार जखमींमधील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. जखमींना उपचारासाठी आधी तेल्हारा आणि नंतर अकोला येथे रुग्णालयात नेल्याची प्राथमिक माहिती. घटनेची माहिती मिळताच हिवरखेड ठाणेदार गजानन राठोड आणि पोलीस ताफा घटनास्थळी हजर झाला. त्यांनी रुग्णवाहिका बोलावून जखमींना रवाना केले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..