तापी पाटबंधारे विभागाच्या निवृत्त अभियंत्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा

तापी पाटबंधारे विभागाच्या निवृत्त अभियंत्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव : सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधीतून शेततळ्याचे काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून कंत्राटदाराची तापी पाटबंधारे विभागाचे तत्कालिन वरिष्ठ अभियंता व्ही. डी. पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संगनमताने‌ सुमारे ४५ लाख रुपयांना फसवणूक केली होती.याप्रकरणी जळगाव जिल्हा न्यायालयाच्या आदेशावरून शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्यात पाटील यांचेसह कार्यकारी अभियंता गोकुळ महाजन व अन्य संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कंत्राटदार अजय बढे यांनी तत्कालीन पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांची भेट घेऊन तक्रार केली होती. त्यानुसार अधीक्षकांनी सदर तक्रारीची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविली होती. मात्र, या प्रकरणी फक्त दोन जणांविरुद्ध तक्रार करावी, असे अजय बढे यांना कळविण्यात आले होते. त्यामुळे बढे यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या निर्णयाविरुद्ध जळगावच्या कनिष्ठ न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने सर्व पुरावे लक्षात घेवून व्ही.डी.पाटील, कार्यकारी ‌अभियंता गोकुळ‌ ण महाजन यांच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध निवृत्त वरिष्ठ अभियंता पाटील व इतरांनी जिल्हा न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणी अपर जिल्हा न्यायाधीश एस.आर. पवार यांच्या न्यायालयात सुनावणीझाली. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय कायम ठेवला.  निवृत्त वरिष्ठ अभियंता व्ही.डी पाटील, कार्यकारी अभियंता गोकुळ‌ महाजन आणि सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश रामानंदनगर पोलिसांना दिले. त्यानुसार पाटील, महाजन यांच्यासह गोल्ड रिव्हर कंपनीचे (मुंबई) सूर्यवीर चौहान, सनदी लेखापाल सुहास भट (मुंबई), व्ही. के. जैन, पवन कोलते, ललित चौधरी, पंकज नेमाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

  • Related Posts

    भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?

    एका डॉक्टरनेच ख्रिसमस मार्केटमध्ये भरधाव कार घुसवली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टरने केलेल्या या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. तालेब याने भर…

    थेट पार्सलमध्ये आला बॉम्ब, मोठा स्फोट, दोन जण गंभीर जखमी, शहरात मोठी खळबळ

    एका डिलिव्हरी बॉयने पार्सल देताच स्फोट झाला. या स्फोटात डिलिव्हरी बॉय आणि पार्सल घेणारी व्यक्ती जखमी झाली. पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला ताब्यात घेतले असून, जुन्या वैमनस्यातून हा स्फोट घडवल्याचा संशय आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?

    भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?

    थेट पार्सलमध्ये आला बॉम्ब, मोठा स्फोट, दोन जण गंभीर जखमी, शहरात मोठी खळबळ

    थेट पार्सलमध्ये आला बॉम्ब, मोठा स्फोट, दोन जण गंभीर जखमी, शहरात मोठी खळबळ

    रुग्णांवर उपचार, वर्षभरानंतर औषध बनावट असल्याची धक्कादायक बाब पुढे.

    रुग्णांवर उपचार, वर्षभरानंतर औषध बनावट असल्याची धक्कादायक बाब पुढे.

    सोसायट्या अडचणीत! नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यवधी रुपये अडकले

    सोसायट्या अडचणीत! नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोट्यवधी रुपये अडकले

    “हल्ला निषेध” : महसूल खात्याच्या पथकावर झालेल्या हल्ल्याचा निषेध.

    “हल्ला निषेध” : महसूल खात्याच्या पथकावर झालेल्या हल्ल्याचा निषेध.

    नेहरू युवा केंद्रांच्या वतीने एक दिवसीय नशामुक्ती जागरूकता कार्यक्रम व कार्यशाळा संपन्न

    नेहरू युवा केंद्रांच्या वतीने एक दिवसीय नशामुक्ती जागरूकता कार्यक्रम व कार्यशाळा संपन्न