कर्जबाजारी जावयाचा सासऱ्याच्या तिजोरीवर डल्ला, 28 लाखांचा ऐवज लांबवला

कर्जबाजारी जावयाचा सासऱ्याच्या तिजोरीवर डल्ला, 28 लाखांचा ऐवज लांबवला

जळगाव | भुसावळ येथील सोमनाथ नगर शिवशक्ती कॉलनी या ठिकाणी राहणाऱ्या अनिल हरी ब-हाटे यांच्या घरात लोखंडाची खिडकी तोडून 33 तोळ्याचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे एकूण 28 लाख पंचावन्न हजाराचा ऐवज चोरीला गेला होता. चोरी त्यांच्या जावयानेच केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून 21 लाख पाच हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भुसावळ येथील सोमनाथ नगर, शिवश्क्ती कॉलनी या ठिकाणी अनिल हरी ब-हाटे वय 64 वर्ष हे राहतात. ते लग्नाला गेलेले असताना घराच्या मागील लोखंडी खिडकी तोडून चोरटा घरात शिरला. दि. 2 रोजी दुपारी 2 ते 10 वाजेच्या दरम्यान घरात ठेवलेले 33 तोळे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रुपये 2 लाख 60 हजार रुपये रोख असा एकूण 28 लाख 55 हजार -रुपये किमतीचा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन गुन्हा दाखल झाला होता.पोलीस अधिक्षक जळगांव महेश्वर रेड्डी, तसेच . अप्पर पोलीस अधिक्षक . अशोक नखाते व . उपविभागीय पोलीस अधिकारी . कृष्णात पिंगळे भुसावळ यांनी सदरचा गुन्हा उघडकीस यावा या करीता दिलेल्या सुचना व मार्गदर्शना प्रमाणे भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पो. उपनिरी. मंगेश जाधव, विजय नेरकर, निलेश चौधरी, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, . सोपान पाटील, प्रशांत परदेशी, भुषण चौधरी, राहुल वानखेडे, योगेश माळी, जावेद शहा अश्यांचे पथक तयार करण्यात आले. गुप्त बातमीद्वारा मार्फत बातमी मिळाली की फिर्यादी अनिल हरी ब-हाटे यांचा जावयी राजेंद्र शरद झांबरे रा. फेकरी ता. भुसावळ हा कर्जबाजारी झालेला आहे. अशी माहिती मिळाल्याने गुन्हे शोध पथकाने राजेंद्र शरद झांबरे याचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेतले.
आपणच चोरी केल्याची दिली कबुली

त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्या कडुन गुन्हयातील चोरीस गेलेला मालापैकी 23 तोळे 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 2 लाख, 60 हजार -रुपये रोख असा एकुण 21 लाख 05 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल काढुन दिला. तसेच सदर आरोपीताने गुन्हयातील गेलेल्या मालापैकी इतर 100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने 7 लाख 50, हजार -रुपये किमतीचे चोरी केल्याचे कबुली दिली असुन सदर गुन्हयाचे तपासांत मुद्देमाल हस्तगत करणे बाकी आहे. असा एकुण 28,55,000/-रु. कि. चे सोन्याचे दागिने व रोख रुपयाचा घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

  • Related Posts

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई. प्रतिनिधी | प्रणित काठोके जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत केळी पीक विम्याच्या नावाखाली कोट्यवधी…

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा. प्रतिनिधी: शिवानंद पांचाळ नायगांवकर दिः१३ मार्च शुक्रवार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे शिक्षकांनी दिले निवेदन राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अंशतः…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.