नेहरू युवा केंद्रांच्या वतीने एक दिवसीय नशामुक्ती जागरूकता कार्यक्रम व कार्यशाळा संपन्न येथील नेहरू युवा केंद्र, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार व एन.सी.सी. युनिट, एम. जे. कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय नशामुक्ती जागरूकता कार्यक्रम व कार्यशाळा एम.जे. कॉलेज, एन.सी.सी. युनिट येथे 20 डिसेंबर रोजी संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कला विभागाचे उपप्राचार्य देवेंद्र इंगळे यांनी सर्व उपस्थितांना नशामुक्तीची शपथ देवून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला जिल्हा युवा अधिकारी नरेंद्र डागर ‘ माय भारत पोर्टल ‘विषयी एन.सी.सी. छात्र सैनिकांना माहिती दिली. नशामुक्ती फक्त व्यक्तिशः नाही तर देशाला कसे हानिकारक ठरू शकते तसेच मोबाईलच्या अतिवापरामुळे होणारे नुकसान याविषयी छात्रसैनिक व विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करून हा संदेश समाजात पोहचवण्याचे आवाहन सी.टी.ओ सोनल उप्लपवार यांनी प्रस्ताविकात केले. एम.जे. कॉलेज मधील मानसशास्त्र विभागाचे प्राध्यापक बालाजी राऊत यांनी ‘मोबाईल एडीक्शन ‘ या विषयावर सविस्तर माहिती देऊन जनजागृती केली. या कार्यक्रमास 110 छात्रसैनिक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन लेखा अधिकारी अजिंक्य गवळी केले व सूत्रसंचालन सी.टी.ओ. गोविंद पवार यांनी केले.