सोयाबीन व भरडधान्य खरेदीच्या नोंदणीसाठी शासनाकडून ३१ डिसेबरपर्यंत मुदतवाढ

सोयाबीन व भरडधान्य खरेदीच्या नोंदणीसाठी शासनाकडून ३१ डिसेबरपर्यंत मुदतवाढ किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम २०२४-२५ ज्वारी, मका व बाजरी (भरडधान्य) खरेदी करीता जळगाव जिल्ह्यात पणन महासंघाअंतर्गत एकूण १८ खरेदी केंद्र कार्यरत आहे. यात अमळनेर, पारोळा, चोपडा, एरंडोल, धरणगांव, पाळधी, म्हसावद,

जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर, शेंदुणीं, पाचोरा, भडगाव व चाळीसगाव याठिकाणी खरेदी केंद्र कार्यरत आहे.
मंत्री सर्वश्री, गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील,मंत्री संजय सावकारे, जिल्ह्यातील सर्व आमदार,विभागीय संचालक, उपाध्यक्ष रोहित दिलीपराव निकम, तसेच संचालक  संजय मुरलीधर पवार यांच्या प्रयत्नाने सोयाबीन व भरडधान्य खरेदीच्या नोंदणीसाठी शासनाकडून मुदतवाढ प्राप्त झालेली आहे. भरडधान्य व सोयाबीन खरेदीच्या नोंदणीसाठी ३१ डिसेबरपर्यंत शेतकरी नोंदणी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. ऑनलाईन नोंदणी करीता शेतकऱ्यांना आधारकार्ड, बँक पासबूक व ऑनलाईन पीकपेरा नोंद असलेला ७/१२ उतारा, ८अ इ कागदपत्रे आवश्यक आहे. २०२४-२५ चे हमीभाव ज्वारी (हायब्रीड) ३३७१ रुपये, मका २२२५ रुपये, बाजरी २६२५ रुपये, सोयाबीन ४८९२ रुपये आहेत.
भरडधान्य खरेदीसाठी संबंधीत शेतक-यांनी खरेदी केंद्रावर लाईव्ह फोटो देवून नोंदणी पूर्ण करावी आणि शेतकरी बंधुंनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एस. एस. मेने यांनी केले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..