भर बाजारात भीषण कार हल्ला, ख्रिसमस मार्केटमध्ये डॉक्टरने घुसवली BMW; २०० जखमी, कारण काय?

एका डॉक्टरनेच ख्रिसमस मार्केटमध्ये भरधाव कार घुसवली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टरने केलेल्या या कृत्याने सर्वांनाच धक्का बसला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. तालेब याने भर बाजारात कार का घुसवली, हे दुसऱ्या दिवसापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. पूर्वाश्रमीचा मुस्लिम असल्याचे सांगणाऱ्या तालेबने दररोज डझनभर ट्वीट (एक्स) आणि रिट्वीट्स केल्याचे समोर आले आहे. यांमध्ये इस्लामविरोधी संकल्पना, धर्मावर टीका आणि धर्म सोडलेल्या मुस्लिमांचे अभिनंदन करण्यात आल्याचे आढळते.
 सर्वत्र ख्रिसमसच्या तयारीची लगबग असताना, जर्मनीच्या मॅग्डेबर्ग शहरावर शोककळा पसरली. एका सौदी डॉक्टरने आपली बीएमडब्ल्यू कार जाणूनबुजून येथील गर्दीच्या ख्रिसमस मार्केटमध्ये घुसवून खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना चिरडले. या हल्ल्यात एका बालकासह पाच जणांचा मृत्यू झाला, तर सुमारे २०० जण जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. अधिकाऱ्यांनी ५० वर्षीय हल्लेखोराला अटक करून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पेशाने डॉक्टर असलेला हल्लेखोर मागील दोन दशकांपासून जर्मनीत वास्तव्यास असून, तो मॅग्डेबर्गच्या दक्षिणेस सुमारे ४० किलोमीटरवर असलेल्या बर्नबर्ग येथे प्रॅक्टिस करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ‘या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या दोनवरून पाच झाली आहे, तर २००हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत’, असे सॅक्सोनी-अनहॉल्ट राज्याचे गव्हर्नर रिनर हॅसेलॉफ यांनी पत्रकारांना सांगितले. तर, ‘जखमींपैकी ४० जणांनी स्थिती गंभीर आहे. आम्हाला त्यांच्याबद्दल खूप काळजी वाटत आहे’, असे चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांनी नमूद केले. हल्लेखोराचे नाव तालेब ए. असल्याचे जर्मनीतील अनेक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. मात्र, गोपनीयतेच्या कायद्यानुसार त्याचे आडनाव उघड करण्यात आलेले नाही. तालेब मानसोपचारतज्ज्ञ असल्याचे सांगण्यात येते. मानसोपचारतज्ज्ञ असूनही त्याने अशाप्रकारचे पाऊल का उचलले हे अद्याप समोर आलेलं नाही.पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने कार हल्ला झालेल्या परिसरासह संपूर्ण जर्मनी हादरलं आहे. ख्रिसमस अगदी तोंडावर असताना हे कृत्य डॉक्टरने का घडवून आणलं याचा तपास सुरू आहे. भर रहदारीच्या वेळी, गर्दीच्या बाजारात घडलेल्या या घटनेने लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..