विद्यार्थ्यांनी अनुभवले ऐतिहासिक स्थळांचे वैभव:मुख्याध्यापक पी.जी भालेराव यांचे मत.

विद्यार्थ्यांनी अनुभवले ऐतिहासिक स्थळांचे वैभव:मुख्याध्यापक पी.जी भालेराव यांचे मत.  आ. गं. हायस्कूल व ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता 5 वी ते 12 वी च्या 160 विद्यार्थ्यांची व 20 शिक्षक-कर्मचाऱ्यांची शैक्षणिक सहल 21 डिसेंबर 2024 रोजी उत्साहात संपन्न झाली. या सहलीत विद्यार्थ्यांनी वेरूळ लेणी, दौलताबादचा देवगिरी किल्ला, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आणि भद्रा मारुती या ऐतिहासिक स्थळांना भेट देत त्यांच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्वाची माहिती घेतली.

सहलीचा प्रवास राज्य परिवहन मंडळाच्या चार बसेसद्वारे सुखरूप पार पडला. अनेक वर्षांनंतर सहलीचे आयोजन झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक वारसा व भारतीय संस्कृतीचा अभ्यास करत मनसोक्त आनंद घेतला.
मुख्याध्यापकांचे मनोगत .
मुख्याध्यापक  पी. जि. भालेराव यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष अनुभव देणे हे शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या सहलीमुळे विद्यार्थ्यांना भारताच्या ऐतिहासिक स्थळांचे वैभव आणि महत्त्व समजले. अशा शैक्षणिक सहली विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकणाऱ्या ठरतात. ही सहल यशस्वी होण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.”
सहलीच्या यशस्वीतेसाठी सावदा नगरपरिषद मुख्याधिकारी मा. भूषण वर्मा व गटशिक्षणाधिकारी  विलास कोळी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. पर्यवेक्षक वाय. एन. पाटील आणि सर्व शिक्षक, महिला शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी सहलीच्या व्यवस्थापनात मोलाचे योगदान दिले.
विद्यार्थी पालकांनी या नाविन्य पूर्ण निसर्ग ऐतिहासिक सहलीचे अभिनंदन केले आहे .

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..