पुण्यात भीषण अपघात, डंपरने नऊ जणांना चिरडलं, तिघांचा मृत्यू, सहा जण गंभीर

पुण्यातून एक अतिशय धक्कादायक घटना पुढे येताना दिसतंय. या घटनेने मोठी खळबळ निर्माण झालीये. पुण्यात मध्यरात्री भीषण अपघात झालाय. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहेत. अमरावतीहून कामानिमित्त बारा जण पुण्यात आले होते. मात्र, येण्यास उशीर झाल्याने ते रात्री फूटपाथवरच झोपले होते. पुण्यात एक मोठी अपघाताची घटना घडलीये. या अपघातात डंपरने फूटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडले आहे. पुणे येथे हा भीषण अपघात झालाय. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झालाय. वाघोली केसनंद फाट्यावर ही अपघाताची घटना घडलीये. फूटपाथवर हा डंपर गेला आणि झोपलेल्या 9 जणांना चिरडले. जखमींमधील सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. वैभवी रितेश पवार (वय 1 वर्ष), वैभव रितेश पवार वय 3 वर्ष, रीनेश नितेश पवार, वय 30 वर्ष अशी मृतांची नावे आहेत. तर सहा जण जखमी आहेत. जखमींना ससून रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हे सर्व कामगार आहेत. डंपर चालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. मृत्तांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त केली जातंय. याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, रविवारी मध्यरात्री कामगार कामासाठी अमरावती येथून कामानिमित्त वाघोली येथे आले होते. रात्री उशीर झाल्याने 12 जण फुटपाथवर झोपले होते. तर काही जण फुटपाथच्या बाजूला झोपले होते. मध्यरात्री साधारण 12.30च्या सुमारस मद्यधुंद अवस्थेत असलेला डंपर चालक वेगात आला आणि फुटपाथवर झोपलेल्या कामगारांच्या अंगावर गेला. यात तिघांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून कारवाई कारण्याचे काम सुरू आहे. या भीषण अपघातानंतर असा आरोप केला जातोय की, हा डंपर चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता. पोलिसांनी पुढील कारवाई करण्यास सुरूवात केलीये. अधिक माहिती अशी की, अपघातग्रस्त सर्वजण हे मजूर असून या अपघातनंतर त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी डंपर जप्त केले असून चालकाविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. डंपर चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. डंपर चालकाचे नाव गजानन शंकर तोटे (26 वर्षे) असून रा. नांदेड यास ताब्यात घेतला असून मेडिकल करण्यासाठी ससून हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले.

जानकी दिनेश पवार, 21 वर्षे, रिनिशा विनोद पवार 18, रोशन शशादू भोसले, 9 वर्षे, नगेश निवृत्ती पवार, वय 27 वर्षे, दर्शन संजय वैराळ, वय 18, आलिशा विनोद पवार, वय 47 वर्षे. जखमींना प्राथमिक उपचार आयनॉक्स हॉस्पिटल येथे करून ससून रुग्णालयात रवाना केले आहे. मृतदेह आयनॉक्स हॉस्पिटल येथून ससून येथे पाठवण्यात आले. घटनास्थळी झोन 2 एसीपी खाडे, एसीपी सोनवणे आणि इतर पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..