मयत नीलेश हा त्र्यंबक शहरातील रहिवासी होता. जमिनीच्या वादातून त्याचा काटा काढण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्र्यंबक पोलिसांनी शनिवारी रात्री काही नातेवाईकांची चौकशीही केली. परंतु, विशेष काही हाती लागले नसल्याचे समजते.त्र्यंबकेश्वर येथे जव्हार रोडवर वीटभट्टी परिसरात नीलेश परदेशी (वय ४०) या तरुणाचा शनिवारी रात्री (ता.२१) उशिरा मृतदेह आढळून आला. मृतदेहाजवळ पिस्तुलाच्या रिकाम्या पुंगळ्या आढळून आल्या आहेत. तसेच, तरुणाला गोळ्या घालून ठार करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. या घटनेने त्र्यंबक शहर व परिसरात घबराट निर्माण झाली असून, घडल्या प्रकाराबाबत पोलिस अधिक माहिती देत नसल्याने आश्चर्य व संशयही व्यक्त केला जात आहे. मारेकऱ्यांना शोधून त्यांना जेरबंद करण्यासह शहर भयमुक्त करण्याचे आव्हान त्र्यंबक पोलिसांपुढे आहे. मयत नीलेश हा त्र्यंबक शहरातील रहिवासी होता. जमिनीच्या वादातून त्याचा काटा काढण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्र्यंबक पोलिसांनी शनिवारी रात्री काही नातेवाईकांची चौकशीही केली. परंतु, विशेष काही हाती लागले नसल्याचे समजते. रविवारी दिवसभर जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पोलिस ठाण्याला भेटी दिल्या. नीलेशच्या मृतदेहावर रविवारी दुपारी पाच वाजेच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.










