पुण्याचाही झालाय बिहार; मनगट, कोपऱ्यापासून तोडला हात.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं दिसत आहे. पुण्यातील गुन्ह्यांमध्ये वाढ होत असलेली पाहायला मिळत आहेत. अशातच पुण्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वारजे परिसरात पूर्ववैमनस्यातून टोळक्याने तरुणावर कोयत्यासह कुऱ्हाडीने वार केल्याची घटना घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. कोयता व कुऱ्हाडीच्या घावामुळे तरुणाचा एक हात मनगटापासून आणि दुसरा हात कोपऱ्यापासून तुटला. त्यानंतर टोळक्याने परिसरातील नागरिकांवर कोयते उगारून दहशत निर्माण केली. अक्षय राजेंद्र कांबळे (वय २८, रा. म्हाडा वसाहत, वारजे) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सहा ते सातजणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जुबेर करीम शेख (वय २२, रा. म्हाडा वसाहत, वारजे) याने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

66 या प्रकरणात दोन आरोपींनी अटक करण्यात आली आहे. त्यांना रविवारी सुटीच्या न्यायालयात हजर केले असून, दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुख्य आरोपीसह अन्य आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वारजे माळवाडी पोलिस ठाण्याचे गुन्हे निरीक्षक नीलेश बडाख यांनी दिली. जखमी तरुणाचे दोन्ही हात तुटले होते. त्वचेमुळे तुटलेला भाग लोंबकळत होता. तरुणाला सुरुवातीला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला ससून रुग्णालयात दाखल केले. तिथे हातांवर शस्त्रक्रिया करून हात जोडण्यात आले आहेत. मात्र, शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे किंवा नाही, हे आताच सांगता येणार नसल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी नमूद केले. अक्षय कांबळे, त्याचे मित्र जुबेर शेख, फारुख मणियार हे शुक्रवारी (२० डिसेंबर) रात्री साडेअकराच्या सुमारास म्हाडा वसाहत परिसरात शेकोटी पेटवून थांबले होते. त्या वेळी आरोपी तेथे आले. टोळक्याने अक्षय याच्यावर कोयते आणि कुऱ्हाडीने हल्ला केला. यामध्ये त्याच्या उजव्या हाताचे मनगट आणि डाव्या हाताचा कोपरा तुटून वेगळा झाला. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त सरदार पाटील, वरिष्ठ निरीक्षक मनोज शेडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. गुन्हे शाखेचे निरीक्षक नीलेश बडाख तपास करीत आहेत.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..