माझ्या मुलाचे तुकडे करून देऊ नका…वडिलांचा आक्रोश, चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरील चेंगराचेंगरीत गमावला मुलगा.

 बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आरसीबीच्या विजयाचा जल्लोषा साजरा केला जात होता. विराट कोहली आणि आरसीबीच्या टीमला बघण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली. ही गर्दी इतकी जास्त वाढली की, पोलिसांना गर्दी नियंत्रित करण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. या लाठीचार्जनंतर चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला. सुरक्षा रक्षकांनी गर्दी रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना प्रचंड गर्दीसमोर मार्ग सोडावा लागला.

या चेंगराचेंगरीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चिन्नास्वामी स्टेडियमसमोर आता चप्पलांचा ढिगारा पसरला आहे.हैराण करणारी घटना म्हणजे बाहेर चेंगराचेंगरी झालेली असताना देखील स्टेडियमच्यामध्ये जय्यत कार्यक्रम सुरू होता. या चेंगराचेंगरीमध्ये १ जणांचा मृत्यू झाला तर ३० जण गंभीर जखमी झाली आहेत. सध्या जखमींवर उपचार सुरू असून सरकारकडून मोफत उपचार केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी कालच जाहीर केले. आरसीबी संघाच्या परेडचेही आयोजन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये आपला मुलगा गमावलेल्या वडिलांनी मोठी मागणी करत म्हटले की, माझ्या मुलाचे शवविच्छेदन न करता आम्हाला द्या…त्याचा मृतदेह परत द्या…हे बोलताना वडिलांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. ते पुढे म्हणाले की, माझा एकच मुलगा होता, जो आता राहिला नाहीये. त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून आम्हाला देऊ नका…त्याचा आहे तसा मृतदेह परत द्या…तरूणाचे वडील हे अधिकाऱ्यांना शवविच्छेदन न करता मुलाचा मृतदेह द्या अशी विनंती करत होते. मुलाच्या वडिलांनी हे देखील म्हटले की, तो त्यांना न सांगता चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर पोहोचला होता. पण आता काहीच शिल्लक राहिले नाही. किमान आम्हाला त्याचे अंत्यसंस्कार तरी करून द्या असे वडील म्हणत होते. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या या चेंगराचेंगरीमध्ये ११ जणांचा जीव गेला असून कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.