मालेगावमध्ये काही तरुण जीव धोक्यात घालून स्टंटबाजी करत आहेत. गिरणा नदीवरील बंधाऱ्याच्या सांडव्यावर ही मुले उड्या मारत आहेत. विशेष म्हणजे, यातील बहुतेक मुले अल्पवयीन आहेत. याआधीही अशा स्टंटबाजीमध्ये काही तरुणांचा मृत्यू झाला आहे. तरीही, हे तरुण धोकादायक कृत्य करत आहेत.










