शिलॉंग पोलीस 23 मे रोजी हे जोडपे बेपत्ता होण्यापूर्वीच्या घटनाक्रम जुळवण्याचा प्रयत्न करत आहेत. 21 मे रोजीचा हा व्हिडिओ पोलिसांना तपासासाठी महत्त्वाचा पुरावा ठरण्याची शक्यता आहे.मेघालयमध्ये हनिमूनसाठी गेलेल्या इंदूरच्या बेपत्ता जोडप्यापैकी पतीचा मृतदेह खोल दरीत आढळला, तर पत्नीचा ठावठिकाणा अद्याप लागलेला नाही. राजा रघुवंशी (वय 29) असे मृत तरुणाचे नाव असून, पत्नी सोनम 23 मे पासून बेपत्ता आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे जोडपे शिलॉंगमध्ये एकत्र चेक इन करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये सोनम तिच्या पतीसोबत रजिस्टरवर सही करताना दिसत आहे.शिलॉंग पोलीस 23 मे रोजी हे जोडपे बेपत्ता होण्यापूर्वीच्या घटनाक्रम जुळवण्याचा प्रयत्न करत आहेत. 21 मे रोजीचा हा व्हिडिओ पोलिसांना तपासासाठी महत्त्वाचा पुरावा ठरण्याची शक्यता आहे. राजाचा मृतदेह इंदूरला परत आणण्यात आला आहे, तर सोनमचा शोध अजूनही सुरू आहे. तिचा भाऊ मेघालयला रवाना झाला आहे.दरम्यान, राजाच्या इंदूरमधील घराबाहेर “राजाचा आत्मा सरकारला आवाहन करतो – मी मेलो नाही, मला मारले. सीबीआय चौकशी करू द्या,” अशा आशयाचे एक रहस्यमय पोस्टर लावण्यात आले होते.हे जोडपे 23 मे रोजी चेरापुंजी जवळील ओसारा हिल्सजवळ बेपत्ता झाले. कुटुंबीयांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क न झाल्याने ते स्वतः शिलॉंगला पोहोचले.










