सांगली हादरलं! खून का बदला खून से… जामिनावर बाहेर आलेल्या महेशला भर बाजारात संपवत २०२१ मधील मर्डरचा घेतला बदला.

सांगलीत शंभर फुटी रोडवर भाजी विक्रेत्यावर अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून खून केला. मृताचे नाव महेश कांबळे असून त्याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हा दाखल होता व तो जामिनावर बाहेर होता.सांगलीतील शंभर फुटी रोडवर असलेल्या घाटगे पाटील शोरूमच्या कॉर्नरला भल्या पहाटे भाजी विक्रेत्याचा दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून निर्गुण खून केला. डोक्यात, चेहऱ्यावर आणि पोटात कोयत्याने वर्मी वार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास खुनाची थरारक घटना घडली. महेश प्रकाश कांबळे असे खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. मृत कांबळे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे. दोन वर्षांपूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता.

दरम्यान, दोघा संशयितांची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्या शोधासाठी दोन पथके तैनात केली आहेत.मृत महेश कांबळे याचा होलसेल भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. संशयित कांबळे याने २०२१ साली आर्थिक वादातून संजयनगर परिसरात एका भाजी विक्रेत्याचा खून केला होता. या गुन्ह्यातून दोन वर्षांपूर्वी तो बाहेर आला होता. आज सकाळी महेश कांबळे हा होलसेल भाजी विक्रीसाठी १०० फुटी रोडवरील घाटगे पाटील शोरूम जवळ आला होता.पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून तो लघुशंकेसाठी घाटगे पाटील कॉर्नर ते पत्रकारनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर थांबला होता. यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोन हल्लेखोरांनी कोयत्याने महेश याच्या डोक्यात वर्मी घाव केले. यावेळी तो काही अंतरावर जाऊन कोसळला. यानंतरही हल्लेखोरांनी त्याच्या चेहऱ्यावर आणि पोटावर वार करून तेथून पळ काढला.दरम्यान, काही अंतरावर महेश याचा भाऊ भाजी विक्री करत होता. त्याने तातडीने महेश याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत पाहणी केली. हल्लेखोर दोघे हे महेश कांबळे याने केलेल्या खुनातील मृताचा एक नातेवाईक असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि शहर पोलिसांची दोन पथके संशयितांचा शोध घेत आहेत. घटनास्थळी उपअधीक्षक प्राणिल गिल्डा यांनी भेट दिली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.