लव्ह जिहादच्या दोन खळबळजनक घटना नाशिकमध्ये; सातपूर आणि अंबड पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिकमध्ये ‘लव्ह जिहाद’चे दोन खळबळजनक प्रकार उघडकीस आले असून, सातपूर आणि अंबड पोलीस ठाण्यांत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही प्रकरणांमध्ये पीडित महिला हिंदू असून आरोपी मुस्लिम युवक आहेत. या दोघांनी आपली खरी ओळख लपवून पीडित महिलांशी संबंध ठेवत लग्न आणि नोकरीच्या आमिषाने त्यांच्यावर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. या दोन्ही घटनांबाबत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी माहिती देताना सांगितले की, पीडित महिलांनी तक्रारी दिल्यानंतर तपास सुरू आहे. आरोपींची ओळख लपवून लिव्ह-इनमध्ये राहत महिलांवर दबाव टाकण्यात आला. दोन्ही प्रकरणात पीडित महिलांना अपत्य असून, आरोपींकडून त्यांच्यावर धर्मांतरासाठी सतत दबाव टाकण्यात आला. नाशिकच्या सतपुरात लव्ह जिहादचा प्रकार सातपूरमध्ये घडलेल्या घटनेत आरोपी मोहम्मद उजैर आलम (वय 37) याने स्वत:चं नाव ‘राजू’ असं सांगत 2013 मध्ये दिल्लीत राहणाऱ्या एका हिंदू तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं.










