कोल्हापूरमधील खूनाला वेगळेच वळण! लिव्ह इनमधील गर्लफ्रेंडला संपवणाऱ्या सतीशबाबत धक्कादायक माहिती समोर.

कोल्हापुरात लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये झालेल्या भांडणामुळे सतीश यादवने त्याची मैत्रीण समीक्षा उर्फ सानिका नरसिंगे हिची हत्या केली. हत्येनंतर फरार झालेल्या सतीशने शाहूवाडीत जाऊन टोकाचं पाऊल उचललं आहे.लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये झालेल्या भांडणामुळे मैत्रिणीचा खून करणाऱ्या तरुणाने आत्महत्या केली आहे. सतीश यादवने शाहूवाडी तालुक्यातील माळापुरे कातळापुडी येथे गळफास घेतला. त्याने मंगळवारी समीक्षा उर्फ सानिका नरसिंगे नावाच्या आपल्या मैत्रिणीची हत्या केली होती. त्यानंतर तो फरार झाला होता.सतीश यादवचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापूरच्या रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “लिव्ह इन रिलेशनशिप मधून झालेल्या वादात समीक्षा उर्फ सानिका नरसिंगे हिचा खून करून झाला होता.

घटनेनंतर आरोपी सतीश यादव हा स्वतःच्या गावी गेला आणि तिथे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.”सतिश यादव (वय 25) याने लग्नाला नकार दिल्याने समीक्षाच्या छातीत धारदार शस्त्राने वार केले. समीक्षा कोल्हापुरातील कसबा बावडा येथे आई, बहीण आणि भावासोबत राहत होती. 2018 मध्ये तिचे लग्न झाले होते. लग्नानंतर तीन महिन्यातच तिने नवऱ्याला सोडले. कारण त्यांचे सतत भांडण होत होते. त्यानंतर ती आईसोबत राहत होती. समीक्षा इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करत होती. याच दरम्यान तिची ओळख आयशू आंपले आणि सतिश यादव यांच्याशी झाली. आयशू तेलंगणाची असून ती कामासाठी कोल्हापुरात आली होती. सतिश कोल्हापुरातील शिवाजी पेठ येथे राहत होता.गेल्या तीन महिन्यांपासून समीक्षा, आयशू आणि सतिश सरनोबतवाडी येथील एका 2BHK फ्लॅटमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. पण, मागील काही दिवसांपासून समीक्षा आणि सतिशमध्ये सतत वाद होत होते. त्यामुळे आठ दिवसांपूर्वी समीक्षा आणि आयशू दोघीही आईच्या घरी राहायला गेल्या होत्या. सतिश समीक्षाला भेटण्यासाठी सतत फोन करत होता.ccccccमंगळवारी दुपारी समीक्षा आणि आयशू दोघी फ्लॅटवर सामान घेण्यासाठी गेल्या होत्या. त्या दोघी फ्लॅटवर आल्याचे सतिशला समजले. तो लगेच तिथे पोहोचला. रागाच्या भरात त्याने समीक्षाला एका खोलीत नेले. तिथे त्याने तिच्या छातीत चाकूने वार केला. “या हल्ल्यात समीक्षा जागेवरच कोसळली. हा हल्ला इतका भीषण होता की चाकू तरुणीच्या बरगड्यात अडकला होता,” असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सतिशने खोलीला बाहेरून कडी लावली आणि तो दुचाकीवरून पळून गेला.दरम्यान, पोलीस आरोपी सतिश यादवचा शोध घेत असतानाच आता त्याने आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.