मयुरीचा जाच, मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करत पतीने आयुष्य संपवलं, पत्नीला अटक, पुण्यात खळबळ.

राज्यभरात दिवसेंदिवस आत्महत्येच्या घटना वाढताना दिसत आहेत. त्यातच पुणे जिल्ह्यात उरुळी कांचन परिसरातील कोरेगाव मूळ भागात तरुणाने आयुष्य संपवल्याचा प्रकार समोर आला आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप आहे. पत्नी मानसिक त्रास देत असल्याने पतीने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने मोबाइमध्ये व्हिडिओ करत आपबिती सांगितल्याची माहिती आहे.सुरज दामोदर पवार (वय 32, रा. इनामदार वस्ती चिंतामणी हॉस्पिटलचे पाठीमागे जेधे चाळ, कोरेगावमुळ ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

ही घटना बुधवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली आहे.या प्रकरणी तरुणाचे वडील दामोदर निवृत्ती पवार, (वय 60, धंदा-शेती रा. वाल्हे, वागदरवाडी ता. पुरंदर) यांनी फिर्याद दिली आहे. यावरून पत्नी मयुरी सुरज पवार उर्फ मयुरी अनिल जाधव, (वय 26) हिच्यावर गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी सुरज पवार व मयुरी जाधव यांचा विवाह झाला होता. कोरेगाव मूळ येथील इनामदार वस्ती परिसरात राहत होते. मात्र बुधवारी किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाल्याची माहिती समोर आली आहे.

पत्नीने दिलेल्या मानसिक त्रासातून सुरजने राहत्या घरात छताच्या अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत त्याने मोबाईल फोनमध्ये चित्रिकरण करून ठेवले होते. पत्नी मयुरीने दिलेल्या मानसिक त्रास, भांडण आणि मारहाणीमुळे सुरजने आयुष्य संपवलं आहे. त्याच्या आत्महत्येस त्याची पत्नी जबाबदार आहे, असा आरोप कुटुंबाने केला आहे.मयुरी पवार उर्फ मयुरी जाधव हिच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार दिली आहे. त्यानुसार बीएनएस कलम 108, 118(1), 115 (2) नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. या घटनेने पुण्यातील पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.