भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, मृतांमध्ये 4 वर्षीय त्रिवेणीसह आईचाही समावेश.

घडला. नाशिकहून सटाण्याकडे जात असलेली ग्रँड आय 10 कार भरधाव वेगाने जाऊन कोल्हापूर फाटा येथील विठोबा आहेर यांच्या बंगल्याच्या बीमला धडकली. या अपघातात नामपूर येथील भदाणे कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.ही दुर्घटना मंगळवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. कारचा वेग प्रचंड होता आणि वाहन चालवणाऱ्या व्यक्तीचा ताबा सुटल्यामुळे कार थेट विठोबा आहेर यांच्या बंगल्याच्या संरक्षक बीमवर आदळली. या भीषण अपघातात गाडीचा समोरचा भाग अक्षरशः चुराडा झाला.अपघातानंतर कळवण, मानूर, व कोल्हापूर फाटा परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि काही क्षणातच अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली.

जखमींना तातडीने कळवण ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस आणि स्थानिक प्रशासन यांच्याकडून पुढील तपास सुरू आहे.मृतांमध्ये शैला वसंत भदाण (वय ६२), सरला भालचंद्र भदाण (वय ५०), चालक खालिक मेहमूद पठाण (वय ५०), माधवी मेतकर (वय ३२) आणि त्रिवेणी मेतकर (वय ४) यांचा समावेश आहे. भालचंद्र भदाण (वय ५२) आणि उत्कर्ष मेतकर (वय १२) गंभीर जखमी झाले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना नाशिकला हलवले आहे.

अपघातामुळे भदाण आणि मेतकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शैला भदाण आणि माधवी मेतकर या मायलेकी होत्या. त्रिवेणी ही माधवीची मुलगी होती.दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. “कळवण उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर नाशिक येथे रुग्णालयात हलवण्यात आले आहे,” असे डॉक्टरांनी सांगितले. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.