मित्राच्या कर्जासाठी जामीनदार झाला पण ज्याची भाती तेच घडलं, ट्रॅकवर हात तुटलेल्या अवस्थेत सापडली बॉडी.

सोलापूर शहरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका तरुणाने धावत्या रेल्वे समोर उडी घेऊन स्वतःच्या आयुष्याचा शेवट केला आहे. नागेश सुरेश अंटद (वय ३९, रा. घर नंबर ८३३, शरणमठ, राठी कारखाना, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मंगळवार, ३ जून रोजी मध्यरात्री साडेदहा वाजेच्या सुमारास रेल्वे डाऊन लाइन किलोमीटर ४५७/२५ च्या जवळ हात कट झालेल्या स्थितीत नागेश अंटद बेशुद्धावस्थेत आढळले होते.उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी नागेश अंटद यांना मृत घोषित केले. शासकीय रुग्णालयात नागेश यांच्या नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. नातेवाईकानी माहिती देताना सांगितले, नागेश अंटद मित्राला कर्ज काढताना त्याला जामीनदार झाले होते मित्राने हफ्ते भरले नव्हते म्हणून फायनान्स कंपनीने तगादा लावला होता, त्याला कंटाळून नागेश यांनी टोकाचे पाऊल उचलले.

नागेश यांच्या मृत्यूने सोलापुरात हळहळ व्यक्त होत आहे.नागेश अंटद मंगळवार, ३ जून रोजी मध्यरात्री साडेदहा वाजेच्या सुमारास रेल्वे डाऊन लाइन किलोमीटर ४५७/२५ च्या जवळ हात कट झालेल्या स्थितीत आढळले. रेल्वे प्रशासनाकडून माहिती प्राप्त होताच सदर बझार पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर रेल्वे रुळावर बेशुद्धावस्थेत पडलेल्या तरुणास उपचारासाठी पोलिस हेडकॉन्स्टेबल आर. एन. मनोहर यांनी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉ. धुव्र गायकवाड यांनी सांगितले. मृत्यूची वार्ता कळताच नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात धाव घेतली.नागेश मित्राच्या कर्जप्रकरणासाठी जामीनदार झाले होते. मित्राने कर्जाचे हप्ते भरले नाहीत, त्यामुळे फायनान्स कंपनीकडून पैशांसाठी नागेश याच्यांकडे सातत्याने तगादा लावला जात होता. याच त्रासाला ते कंटाळले होते, मानसिक संतुलन बिघडले होते, त्यातूनच त्यांनी जीवन संपविण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता नातेवाइकांनी व्यक्त केली आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.