सोलापूर-पुणे हायवेवर भीषण अपघात; चालकाला डुलकी अन् बस थेट खड्ड्यात पलटली.

सोलापूर: सोलापूर-पुणे महामार्गावर आढेगावच्या परिसरात एक मोठी दुर्घटना घडली. महामार्गावर आज गुरुवारी पहाटे 4 वाजता एका खासगी बसला अपघात झाला. बसचालकाला झोप आल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली. या अपघातात 30 प्रवासी जखमी झाले. त्यापैकी 20 जणांची प्रकृती गंभीर असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे समजते.मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील शिरपूरहून MH 48 के 1918 क्रमांकाची बस पुण्याला निघाली होती. बुधवारी रात्री उशिरा ही बस पुण्याकडे रवाना झाली. पहाटेच्या सुमारास सोलापूर-पुणे महामार्गावर आढेगावच्या शिवारात बस अचानक पलटी झाली.

“आढेगाव शिवारात पहाटे चार वाजण्याच्या सुमारास खासगी बस पलटी झाली,” असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.बस खड्ड्यात पलटी झाल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी आणि इतर वाहनचालकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी प्रवाशांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत केली. महामार्ग पोलिसांनी अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान, अपघातामुळे परिसरात काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून जखमींची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना केली जात आहे.

कराड-लातूर बसला अपघात झाला आहे. लातूर तालुक्यातील रामेगाव-मुरुड अकोला येथे मंगळवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. बस क्रमांक एम एच १४ बी टी ४४३२ मुरूड बस स्थानकातून लातूरकडे निघाली होती. रस्त्यावर चिखल आणि खड्ड्यांमुळे बस पलटी झाली. पावसामुळे रस्त्यावर खूप चिखल झाला होता. त्यामुळे रस्ता निसरडा बनला होता. त्यातच, रस्त्याचे काम चालू असल्यामुळे आणखी समस्या निर्माण झाली. बसचा वेग कमी असल्याने प्रवाशांना गंभीर दुखापत झाली नाही. जखमींना तत्काळ लातूरला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.