लाखोंच्या गर्दीत मोफत तिकिटांची अफवा, एकच गोंधळ उडाला आणि अघटित घडले, बंगळुरू चेंगराचेंगरीमागील कारण समोर.

आरसीबीच्या विजयानंतर चिन्नास्वामी स्टेडियम बेंगळुरूमध्ये गोंधळ उडाला. गेट क्रमांक ७ वर प्रचंड गर्दी जमली होती. हा गेट स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या विरुद्ध दिशेला आहे. तिथे मोफत तिकिटे मिळतील अशी अफवा पसरली होती. काही मिनिटांतच त्या ठिकाणी लोकांचा तांडा जमला. गोंधळादरम्यान तीथे चेंगराचेंगरी झाली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) च्या आयपीएल विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. तिकिटे मिळविण्याच्या चढाओढीत लोक एकमेकांवर कोसळले गेले. ज्यामुळे दुर्दैवी घटना घडली.राजाजीनगर येथील रहिवासी असलेले प्रत्यक्षदर्शी अचिमन्य म्हणाले, “लोकांचा संयम पूर्णपणे सुटला. पोलिसांनी आम्हाला क्यूबन पार्क मार्गे जाण्यास सांगितले, परंतु तोपर्यंत लोकांचा गोंधळ उडाला होता.

चेंगराचेंगरी, जखमी आणि मृत्यूच्या बातम्यांमुळे, लोक सैरावैरा धावू लागले.”अफवेनंतर, काही जण रिचमंड सर्कलकडे धावले. तर काही अनिल कुंबळे सर्कलजवळ पोहोचले. बंगळुरूच्या स्टेडियममध्ये २१ स्टँड आणि १३ गेट आहेत. बहुतेक गेट सामान्य लोकांसाठी खुले होते. गेट क्रमांक ९ आणि १० हे केएससीए सदस्यांसाठी राखीव होते. गेट क्रमांक १२, १३ आणि १४ हे सर्वात जास्त गर्दीचे होते. कारण हे गेट संघाच्या बसच्या प्रवेश मार्गावर होते. मोठ्याप्रमाणात चेंगरारी गेट क्रमांक ७ वर झाली.गर्दी व्यवस्थापनाचा अभाव आणि शहरातील रस्त्यांवर विजयी मिरवणूक काढण्यासाठी परवानगी देण्यात झालेल्या विलंबामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. आरआर नगर येथील ३१ वर्षीय अविनाश एस हा थोडक्यात बचावला.

त्याने सांगितले की, एका रुग्णवाहिकेत ४० जखमी लोक होते. मी वेळेवर बाहेर पडलो हे माझे भाग्य होते. पोलिसांनाही गर्दी व्यवस्थापित करण्यात अडचण येत होती.२५ वर्षीय सिंचना एन, तिच्या मैत्रिणींसह चिन्नास्वामी स्टेडियममध्ये गेली आणि गर्दीत अडकली. “गेट थोडे उघडताच, सर्वजण पुढे धावू लागले. काचेचा पॅनल तुटला आणि लोक जखमी झाले. मी अनिल कुंबळे सर्कलजवळ होते आणि त्यामुळे मी सर्वात वाईट परिस्थितीतून वाचले. पोलिस फक्त लोकांना धक्काबुक्की करत होते आणि ते गर्दीवर योग्यरित्या नियंत्रण ठेवत नव्हते. संध्याकाळी ५.३० च्या सुमारास पाऊस सुरू झाला तेव्हा परिस्थिती आणखी बिकट झाली,” असे ती म्हणाली.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.