बँक अधिकारी असल्याचं भासवलं, हगवणे मायलेकानेच माणसं पाठवून JCB उचलला, नवा कारनामा समोर.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अटकेत असलेल्या हगवणे कुटुंबीयांच्या काळा करनाम्यांची यादी दिवसेंदिवस वाढतच आहे. वैष्णवीचा पती शशांक हगवणे आणि सासू लता हगवणे यांच्या फसवेगिरीचा आणखी एक अंक आता पुढे आला आहे. प्रशांत येळवंडेकडून जेसीबी जप्त करण्यापासून ते स्वतःकडे ताबा घेण्यापर्यंत हगवणे माय-लेकानेच कट रचल्याचं आता पोलीस तपासात समोर आलं आहे. कारण थकीत कर्ज असलेला जेसीबी आम्ही येळवंडेकडून जप्त केलाच नाही, असा खुलासा इंडसइंड बँकेने केला आहे.लता आणि शशांक हगवणे यांनी प्रशांत येळवंडे नामक व्यक्तीला जेसीबीची विक्री केली होती. हा जेसीबी मुळात इंडसइंड बँकेकडून हफ्त्याने घेण्यात आला होता. त्याचे हफ्ते सुरू असतानाच हगवणे कुटुंबीयांनी येळवंडे यांना जेसीबीची विक्री केली. यासाठी त्यांनी येळवंडेकडून 11 लाख 70 हजार घेतले.

मात्र मुळात त्यांनी बँकेचं लोन फेडलं नाही. यानंतर काही दिवसांनी बँकेने हा जेसीबी जप्त केला.शशांक हगवणे यांनी पैसे देण्याचं कबुल केलं, मात्र प्रत्यक्षात पैसे दिले नसल्याचा आरोप येळवंडेंकडून केला जात आहे. बँकेने जप्ती आणलेला जेसीबी काही दिवसांनी शशांक हगवणेंच्या घराजवळ आढळल्याने अनेक सवाल उपस्थित झाले होते. त्यामुळे प्रशांत येळवंडे यांनी हगवणेकडून खरेदी केलेला जेसीबी नेमका कोणी जप्त केला? जप्ती आणलेला जेसीबी गोडाऊनमधून जप्त कसा झाला? यासंदर्भात बँकेची चौकशी करण्यात आली. त्यावेळेस हा सगळा कट हगवणे माय-लेकाचाच होता हे उघड झालं आहे.

जप्त केलेला जेसीबी ज्यांच्या गोडाऊनमध्ये ठेवला त्या रणजित आणि भूषण खांडेभराड यांनी देखील आता हगवणेंनी केलेल्या फसवणुकीचे कारनामे उघडे केले आहेत. येळवंडेकडून जप्त करण्यात आलेला जेसीबी हा आमच्या गोडाऊनपर्यंत पोहचलाच नाही, अशी धक्कादायक माहिती खांडेभराड यांनी पोलीस चौकशीत दिली आहे.येळवंडेकडून जेसीबी जप्त करणारे लोक हे हगवणेची माणसं होती हे जवळपास स्पष्ट झालं आहे. त्यामुळे हा देखील हगवणेच्या कटाचा आणि दादागिरीचा एक भाग असल्याचं समोर आलं आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.