पोलिसांवरच ‘हप्तेखोरी’चा आरोप; नीट काम न केल्यास थेट कारवाई, देवेन भारतींचा सज्जड इशारा.

पोलिसांवरच ‘हप्तेखोरी’चा आरोप; नीट काम न केल्यास थेट कारवाई, देवेन भारतींचा सज्जड इशारामुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी बुधवारी पोलिसांना कडक शिस्तीचा डोस दिला. बार, जुगार अड्ड्यांवर छापे टाकणारी समाजसेवा शाखा पहिल्याच गुन्हे परिषदेत आयुक्तांच्या निशाण्यावर होती. पोलिसांकडून पैसे घेतले जात असल्याच्या आरोपांवरून आयुक्तांनी सर्वांना खडे बोल सुनावले. रस्त्यावरील गुन्हेगारीपासून अंडरवर्ल्डच्या कारवायांपर्यंत सर्व मुद्द्यांना हात घालत, नीट काम न केल्यास थेट कारवाई करण्याचा इशाराच भारती यांनी दिला.मुंबईच्या पोलिस आयुक्तपदाची धुरा सांभाळल्यानंतर देवेन भारती यांनी साधारण महिन्याभरानंतर बुधवारी पहिलीच गुन्हे परिषद घेतली.

मुंबईतील सर्व पोलिस ठाणी, गुन्हे शाखा, विशेष शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सर्व सहायक पोलिस आयुक्त, उपायुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि सहआयुक्त असे वरिष्ठ अधिकारी मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयातील या परिषदेला उपस्थित होते. पहिलीच गुन्हे परिषद असल्याने सर्वांची आयुक्तांसमोर ओळख परेड झाली आणि त्यानंतर भारती यांनी महिनाभरात केलेले अवलोकन आणि आपल्याला अपेक्षित असलेले काम याबाबत पोलिसांना मार्गदर्शन केले.पोलिसांची समाजसेवा शाखा सुरुवातीपासूनच देवेन भारती यांच्या निशाण्यावर राहिलेली आहे. बुधवारीही त्यांनी समाजसेवा शाखेच्या कामाचा लेखाजोखा मांडताना स्पष्ट शब्दात सुनावले. बार, हुक्का पार्लर, जुगाराचे अड्डे यांच्यावर छापे टाकणे एवढेच समाजसेवा शाखेचे काम नाही, तर मानवी तस्करी, बेपत्ता व्यक्तींचा शोध घेणे, देहव्यापाराच्या दलदलीतून महिलांची सुटका, बालकामगार शोधणे ही महत्त्वाची कामेही आहेत. त्यामुळे या शाखेतील अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे. बार तसेच इतर आस्थापनांवर लक्ष ठेवण्याचे काम स्थानिक पोलिसही करू शकतात, असेही ते म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले.पैशाच्या देवाणघेवाणीचे आरोप पोलिसांवर नेहमीच केले जातात. आयुक्तांच्या नावाने अधिकारी पैसे घेत असल्याच्या तक्रारी येत असतात. अशा तक्रारींमध्ये काही तथ्य आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही भारती यांनी पोलिसांना दिला. सकाळी सुमारे दहा वाजता सुरू झालेली गुन्हे परिषद दुपारी दीडच्या सुमारास संपली.अंडरवर्ल्ड गाजवणाऱ्या आणि सध्याही आपापल्या परिसरात दबदबा असलेल्या काही गुंडांची नावे घेत त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्याचे आदेश भारती यांनी पोलिसांना दिले. रस्त्यावरील गुन्हेगारी, बेकायदा फेरीवाले व त्यांच्यामुळे होणारी वाहतूक कोंडी यांसारख्या विषयांवर आपले मत मांडत देवेन भारती यांनी पोलिसांना कारवाईची दिशा दाखवल्याचे सूत्रांकडून समजते.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.