चंद्रपुरात प्रदूषणाचे ५५ बळी; ४९९५ रुग्णांच्या नोंदीने वाढली चिंता, ६ महिन्यांतील धक्कादायक वास्तव.

चंद्रपुरात प्रदूषणाचे मागील सहा महिन्यांत ५५ बळी गेले. याच कालावधीत चंद्रपुरात ४ हजार ९९५ रुग्ण आढळून आले आहेत.राज्यात सर्वाधिक प्रदूषणाच्या यादीत गणल्या जाणाऱ्या चंद्रपुरात प्रदूषणाचे मागील सहा महिन्यांत ५५ बळी गेले. याच कालावधीत चंद्रपुरात ४ हजार ९९५ रुग्ण आढळून आले आहेत. आज, गुरुवारी सर्वत्र जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपुरातील स्थितीवर चिंता व्यक्त होत आहे.राज्यात सर्वाधिक प्रदूषणाच्या यादीत चंद्रपूर गणले जाते. चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात एकूण रुग्णांच्या संख्येपैकी दमा, ॲक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शन, ब्राँकायटिस, फुफ्फुसाचा कर्करोग व इतर श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आढळून येत आहे. २०२१-२४ या मागील चार वर्षांत विविध विकारांचे ३३ हजार १९० रुग्ण आढळले. त्यातील एकूण ३५१ जणांचा मृत्यू हा श्वसनाशी संबंधित आणि अशाच प्रकारच्या विकारांनी झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यात सर्वाधिक मृत्यू हे २०२४ या वर्षात झाले आहेत.चंद्रपुरातील एकूण रुग्णसंख्येपैकी श्वसन विकार व त्वचा रुग्णांची संख्याही मोठी आहे.

डिसेंबर २०२४ ते मे २०२५ या सहा महिन्यांच्या कालावधीत चंद्रपुरात प्रदूषणामुळे पंचावन्न जणांचा मृत्यू झाला आहे. यात ‘ॲक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शन’सोबतच दमा रुग्णांची संख्या मोठी आहे. प्रदूषण कमी झाल्यास या विकारांवर नियंत्रण मिळविणे शक्य होईल, असे जाणकार मानतात. प्रदूषण नियंत्रण महामंडळाने यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.वायू, जल आणि ध्वनीसह विविध प्रकारच्या प्रदूषणांमुळे अनेक लोक विविध आजारांना बळी पडतात. वायुप्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे. अनेक देशांमध्ये वायुप्रदूषण हे जगातील सर्वात मोठ्या ‘किलर’पैकी एक मानले जाते. श्वसनरोग, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि फुप्फुसाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. आपल्याला दिसणारे छोटे कणच आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असतात. शास्त्रज्ञ त्यांना ‘पीएम २.५’ असे संबोधतात. अडीच मायक्रोमीटरपेक्षा लहान व्यासाचे हे कण आपल्या फुप्फुसांमध्ये आणि श्वसनसंस्थेत खोलवर जाऊ शकतात.पायाभूत सोयीसुविधा, नागरी वसाहती, कारखानदारी, रस्ते यांचा झपाट्याने विकास होत असताना हिरवळीचा पट्टा घटत चालला आहे. सुखसुविधा वाढत चालल्या आहेत. त्याच्या कितीतरी पटींनी अधिक प्रदूषणही वाढत आहे. रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांमधून निघणारा धूर पर्यावरणाला आणि पर्यायाने मानवाला हानिकारक ठरत आहे. रस्त्यावरील धूळ, कचरा ज्वलन, बांधकाम आणि स्थानिक उद्योगांमुळे सर्वत्र प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. त्यातून आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्याचे ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.