ट्रक-कार-बाईकचा अपघात, लग्नाला जाणाऱ्या आई-बापासह धाकटा भाऊ मृत्युमुखी, दहावीतला लेक एकटा पडला.

अपघातात दुचाकीचा अक्षरश: चुराडा होऊन गणेश, लक्ष्मी आणि कृष्णा गायकवाड या तिघांचा मृत्यू झाला ट्रक, कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या विचित्र अपघातात बुलढाणा तालुक्यातील घाटनांद्रा गावामधील एकाच कुटुंबातील 13 वर्षीय बालकासह पती-पत्नी ठार झाले. ही हृदयद्रावक घटना चिखली-मेहकर मार्गावरील खैरव-मुंगसरी फाट्यादरम्यान बुधवारी दुपारी साडेतीन वाजता घडली.

दुचाकीने हे कुटुंब मेहकर तालुक्यात आज, गुरुवारी होणाऱ्या लग्नसोहळ्याकरिता जात होते.
चिखली पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेऊन मृतदेह चिखली ग्रामीण रुग्णालयात पाठविले. वाहनांचा अतिवेग किंवा चुकीच्या ओव्हरटेकमुळे हा अपघात घडला असावा असा अंदाज आहे. ट्रक आणि कारच्या चालकांच्या हलगर्जीपणामुळे तिघांचा बळी गेल्याचा प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या.मृत लक्ष्मी गायकवाड यांच्या काकाच्या घरी; मेहकर तालुक्यातील कंबरखेड येथे आज, गुरुवारी लग्नसोहळा होणार आहे. बुधवारी हळदीचा कार्यक्रम होता. त्यासाठी गायकवाड हे कुटुंबासह निघाले होते. मात्र मध्येच अपघात घडला. तिघांचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच लग्नघरी दु:खाचा डोंगर कोसळला.गायकवाड दात्पत्यास आदित्य व कृष्णा ही दोन मुले आहेत. आदित्य नववी उत्तीर्ण होऊन दहावीत गेला आहे. लग्न सोहळ्यासाठी त्यांनी धाकट्या कृष्णाला सोबत घेतले तर आदित्य घरीच थांबला. अपघातात आईवडिलांसह कृष्णाही अपघातात ठार झाल्याने आता त्यांच्या कुटुंबात एकमेव मुलगा राहिला आहे. अपघाताने त्याचा आधार हिरावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.घाटनांद्रा येथील रहिवासी गणेश यादव गायकवाड (40) हे पत्नी लक्ष्मी (35) व मुलगा कृष्णा (13) यांना सोबत घेऊन दुचाकीने प्रवास करीत होते. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास मालवाहू ट्रक आणि कारमध्ये विचित्र भीषण अपघात घडला. या अपघातात दुचाकीचा अक्षरश: चुराडा होऊन गणेश, लक्ष्मी आणि कृष्णा गायकवाड या तिघांचा मृत्यू झाला. तसेच कारमधील काही जण जखमी झाले असून, त्यांच्यावर चिखलीतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची नावे समजू शकली नाही.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.