कौटुंबिक वाद, संशय; त्याने कुऱ्हाड घेतली अन् भावाच्या बायकोच्या डोक्यात… जालना हादरलं.

जालन्यात कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने आपल्या भावाच्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार केला आहे. या घटनेने जालन्यात एकच खळबळ माजली आहे.जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील भोगगाव येथे कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने आपल्या भावजयवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या व्यक्तीने आपल्या भावजयवर संशय घेत शिवीगाळ करत कुऱ्हाडीने डोक्यावर प्राणघातक हल्ला केला. ही धक्कादायक घटना ३ एप्रिल रोजी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी तिर्थपुरी पोलीस ठाण्यात नितीन भरत अंधारे (रा. भोगगाव, ता. घनसावंगी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी दिपाली सचिन अंधारे (वय ३३, व्यवसाय – घरकाम/शेती, रा. भोगगाव) यांनी तिर्थपुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, संशयाच्या आधारावर आरोपी नितीन अंधारे याने शिवीगाळ करत दिपाली यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.

त्यानंतर आरोपीने लाथाबुक्यांनी मारहाण करत त्यांना जिवे मारण्याचीही धमकी दिल्याचा आरोप आहे.या घटनेप्रकरणी पोलीस ठाणे तिर्थपुरी येथे गुन्हा क्रमांक ५१/२०२५, भारतीय दंड संहिता (BNS) कलम १०९, ३५२, ३५१ (२) (३) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेची माहिती मिळताच सपोनि साजिद अहमद यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदर गुन्ह्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा पठाडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

सदर घटनेतील आरोपीला अटक करण्यात आली असून पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सदर घटनेतील आरोपीला आज ५ एप्रिल रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती पोलिस हेड कॉन्स्टेबल नारायण माळी यांनी दिली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.जालन्यातली अंबड तालुक्यातील डोमेगाव गावातील २७ वर्षीय तरुणाने लग्नाच्या १२ दिवसांपूर्वी आपल्या आयुष्याची अखेर केली. राम पांडुरंग धाईत असं या तरुणाचं नाव असून त्याने आपल्या शेतातील झाडाला गळफास घेतला आहे. या तरुणाचं लग्न अवघ्या १२ दिवसांवर असताना त्याने हे टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप काहीही माहिती नाही.

  • Related Posts

    अजित पवार गटाला ‘दे धक्का’, आबांकडून मामांचा पराभव; आदिनाथ कारखान्याच्या अध्यक्षपदी नारायण पाटील

    आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार गटाने सर्व 21 जागा मोठ्या फरकाने जिंकत अजित पवार गटाचे माजी आमदार संजय मामा शिंदे यांचा मोठा पराभव केला. जिल्ह्यात एकीकडे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार…

    गायक नेहा सिंह राठोडवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

     जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येतोय. दरम्यान, पहलगाम हल्ल्याबाबत सोशल मीडियावर मत व्यक्त केल्यानंतर गायक नेहा सिंग राठोड वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    भारतीय वृत्तवाहिन्यांवर पाकिस्तानातील पत्रकार व विश्लेषकांना आमंत्रित करण्यावर तात्काळ बंदी आणावे : ॲड. जमील देशपांडे

    भारतीय वृत्तवाहिन्यांवर पाकिस्तानातील पत्रकार व विश्लेषकांना आमंत्रित करण्यावर तात्काळ बंदी आणावे : ॲड. जमील देशपांडे

    अजित पवार गटाला ‘दे धक्का’, आबांकडून मामांचा पराभव; आदिनाथ कारखान्याच्या अध्यक्षपदी नारायण पाटील

    अजित पवार गटाला ‘दे धक्का’, आबांकडून मामांचा पराभव; आदिनाथ कारखान्याच्या अध्यक्षपदी नारायण पाटील

    गायक नेहा सिंह राठोडवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

    गायक नेहा सिंह राठोडवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

    पाकिस्तानला दणका, चीनची वाढली चिंता; भारताच्या पॉवरफुल निर्णयानं सागरी समीकरणं बदलली.

    पाकिस्तानला दणका, चीनची वाढली चिंता; भारताच्या पॉवरफुल निर्णयानं सागरी समीकरणं बदलली.