मुंबईत रेल्वे अपघात, चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या तरुणाची छिन्नविछिन्न बॉडी पाहून पत्नी अन् आईचा हंबरडा.

मुंबईत रेल्वे अपघातात रत्नागिरीच्या दोन तरुणांना हृदयद्रावक अंत झाला आहे. लोकलमधून प्रवास करत असताना लोकलमधून पडून झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये या दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.रेल्वे प्रवास करताना काळजी घेणे आवश्यक आहे. उत्साहाच्या भरात अनेक जण दरवाजात उभे राहून प्रवास करत असतात मात्र हीच गंभीर बाब जीवावरती बेतू शकते. अशाच दोन वेगवेगळ्या घटना मुंबईत घडल्या आहेत. या दोन्ही वेगवेगळ्या घटनांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील खेड मधील दोन युवकांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे अपघातात खेडच्या दोन तरुणांचा दुःखद मृत्यू झाला आहे. सुशांत गणपत शिगवण (३०) आणि रुपेश गुजर अशी दोघांची नावं आहेत. खेड तालुक्यातील होडखाड-वरचीवाडी येथील रहिवासी आणि सध्या कामानिमित्त मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या सुशांत गणपत शिगवण (३०) या तरुणाचा गुरुवारी रात्री कुर्ला-मुंबई येथे रेल्वे अपघातात मृत्यू झाला. सुशांतचा चार महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता. त्याच्या अकाली निधनाने शिगवण कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

गावावरही शोककळा पसरली आहे.होडखाड-वरचीवाडी येथे वास्तव्यास असलेल्या सुशांत शिगवण याचा डिसेंबरमध्ये तुंबाड येथील तरुणीशी झाला होता. नव्या संसाराची स्वप्ने रंगवत विवाह सोहळ्यानंतर कामानिमित्त मुंबईला गेला होता. कामावरुन परतत असताना त्याचे कुर्ला येथे अपघाती निधन झाले. छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांना अशक्य बनले होते. अखेर अपघातस्थळी पडलेल्या ओळखपत्रावरून ओळख पटवण्यात यश आले. यानंतर तरुणाच्या छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेत रात्रीच गाव गाठले. सुशांतचा मृतदेह पाहून पत्नीसह आईने फोडलेल्या हंबरड्याने साऱ्यांचेच डोळे पाणावले. शुक्रवारी सकाळच्या सुमारास तरुणावर नजीकच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे.तर कामानिमित्त डोंबिवली हून मुंबईला निघालेल्या एका डोंबिवलीकर तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोकलच्या दरवाजात तरुण उभा होता लोकल गर्दीने खचाखच भरलेली असल्याने त्याचा तोल जाऊन खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला. कोपर ते दिवा स्थानकाच्या दरम्यान ही घटना घडली असून रुपेश गुजर असे मृत तरुणाचे नाव आहे. डोंबिवली येथील तुकारामनगरमधील रुपेश हा कुटुंबासह रहातो. गुरुवारी सकाळी साडे आठ ते नऊ च्या सुमारास त्याने डोंबिवली स्थानकातून मुंबईला जाणारी लोकल पकडली. लोकल गर्दीने भरलेली असल्याने तो दरवाजात लटकलेल्या अवस्थेत उभा होता. लोकलने वेग पकडताच गर्दीच्या रेट्याने त्याचा हात निसटला आणि त्याचा तोल जाऊन तो खाली पडला. त्याला गंभीर दुखापत झाली. तातडीने त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारा आधीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

  • Related Posts

    पहलगाममधील हल्ल्यात धर्म विचारून गोळ्या घातल्या, महिलेचा दावा; राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल, म्हणाले…

     जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे २२ एप्रिलला दुपारी अडीचच्या सुमारास (मंगळवारी) दहशतवादी हल्ला झाला. पर्यटनासाठी आलेल्यांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या घटनेने देशात खळबळ उडाली असून दहशतवाद्यांनी धर्म विचारून हल्ला केल्याचा दावा…

    पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्ला खालिद कसुरी कोण आहे? वाचा A टू Z माहिती.

    जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ लोकांचा मृत्यू झाला, ज्यात बहुतेक पर्यटक होते. लष्कर-ए-तैयबाच्या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (टीआरएफ) या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्याचा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पहलगाममधील हल्ल्यात धर्म विचारून गोळ्या घातल्या, महिलेचा दावा; राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल, म्हणाले…

    पहलगाममधील हल्ल्यात धर्म विचारून गोळ्या घातल्या, महिलेचा दावा; राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल, म्हणाले…

    पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्ला खालिद कसुरी कोण आहे? वाचा A टू Z माहिती.

    पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्ला खालिद कसुरी कोण आहे? वाचा A टू Z माहिती.

    जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटक लक्ष्य, ६ जखमी; लष्कराकडून सर्च ऑपरेशन.

    जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटक लक्ष्य, ६ जखमी; लष्कराकडून सर्च ऑपरेशन.

    लग्न ठरलेल्या मुलीने बॉयफ्रेंडच्या घरात संपवलं जीवन? कुटुंबियांचा गंभीर आरोप.

    लग्न ठरलेल्या मुलीने बॉयफ्रेंडच्या घरात संपवलं जीवन? कुटुंबियांचा गंभीर आरोप.