जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात सहा पर्यटक जखमी झाले आहेत. पहलगाम परिसरात पर्यटकांची कायम गर्दी असते. दरवर्षी लाखो पर्यटक या भागाला भेट देतात.श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात सहा पर्यटक जखमी झाले आहेत. पहलगाम परिसरात पर्यटकांची कायम गर्दी असते. दरवर्षी लाखो पर्यटक या भागाला भेट देतात. मार्चमधील बर्फवृष्टीनंतर या भागात पर्यटकांची मोठी गर्दी असते.पहलगामच्या एका डोंगरावर पर्यटक ट्रेकिंगला येतात. तिथेच दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. त्यात दोन पर्यटक जखमी झाले आहेत. अन्य पर्यटक सुरक्षित आहेत. सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे. दहशतवाद्यांकडून झालेल्या गोळीबारामुळे भीतीचं वातावरण आहे.










