जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे २२ एप्रिलला दुपारी अडीचच्या सुमारास (मंगळवारी) दहशतवादी हल्ला झाला. पर्यटनासाठी आलेल्यांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या घटनेने देशात खळबळ उडाली असून दहशतवाद्यांनी धर्म विचारून हल्ला केल्याचा दावा महिलेने केला आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना देशात आमच्या हिंदूंवर जर कोणी अंगावर याल तर आम्ही सगळे हिंदू म्हणून एकत्र येऊन तुमच्या अंगावर जाऊ, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यासाबतच ठाकरेंनी केंद्र सरकार याबद्दल शंका नसल्याचं राज ठाकरे म्हणाले.केंद्र सरकार जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र निषेध व्यक्त करत आहे. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली. ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या प्रसंगात सरकारच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे उभी राहील. केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उडायला हवा.










