बंगळुरूमध्ये ओला-उबरशी स्पर्धा करणारी टॅक्सी कॅब सेवा ब्लूस्मार्ट आणि जेन्सोल सारख्या मोठ्या कंपनीचे प्रवर्तक अनमोल सिंग जग्गी लोभापायी सर्व काही गमावून बसले आहे. आज त्यांच्या कंपनीच्या 7,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाची चौकशी सुरू आहे. सेबीने जेनसोलचे प्रमोटर्स अनमोल सिंग जग्गी आणि पुनीत जग्गी यांना शेअर बाजारात कोणत्याही प्रकारच्या क्रियाकलापांपासून बंदी घातली आहे. दोघांवरही कंपनीच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप असून जग्गीने कंपनीचे कोट्यवधी रुपये हुशारीने आपल्या हौसमौजवर खर्च केले.मोठी कंपनी, कोट्यवधींची कमाई आणि 7 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल एवढं सगळं असूनही फक्त लोभापोटी कसं सगळं उध्वस्त होऊ शकतं याचे जिवंत उदाहरण म्हणजे अनमोल सिंग जग्गी. आधी सेबीने आधी जग्गी यांच्या कंपनीवर पकड घट्ट केली आणि आता ईडीनेही चौकशी सुरू केली असून सरकारही त्यांच्या कंपनीला दिलेल्या सुमारे 7,000 कोटी रुपयांच्या कराराचाही आढावा घेत आहे आणि बाजार विश्लेषकांनुसार यानंतर त्यांचा पर्दाफाश होईल.लाइव्हमिंटच्या वृत्तानुसार, या प्रकरणाशी संबंधित दोन सूत्रांनी सांगितले आहे की जेन्सोल इंजिनिअरिंग लिमिटेडला दिलेल्या सर्व हरित ऊर्जा प्रकल्पांचा केंद्र सरकारकडून आढावा घेतला जाणार आहे. हे प्रकल्प पूर्ण करताना आणि त्यांच्या कामात कंपनीने मानकांचा वापर केला नसल्याचा आरोप असून कंपनीच्या 7000 कोटी रुपयांच्या अपूर्ण ऑर्डर बुकच्या पार्श्वभूमीवर सरकारने चौकशी सुरू केली आहे.










