अपघातांची मालिका सुरुच! भरधाव टिप्पर धडकताच कारचा चक्काचूर, तरुणाचा जागीच अंत.

नागपुरातील गोरेवाडा येथे भीषण अपघात घडला आहे टिप्पर ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून कारचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.नागपुरातील गोरेवाडा येथे भीषण अपघात घडला आहे. भरधाव वेगात आलेल्या टिप्पर ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला मागून धडक देऊन दुकानात प्रवेश केला. या अपघातात कारचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. या अपघातात कारमधून प्रवास करणाऱ्या एकाचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. शहरातील गोरेवाडा भागातील पलोटी शाळेसमोर रविवारी दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर आरोपी टिप्पर चालक ट्रक सोडून पळून गेला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेवाडा पलोटी शाळेसमोरून एक भरधाव टिप्पर जात होता. त्या टिप्परचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे टिप्पर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यात टिप्परने समोरून येणाऱ्या कारला धडक दिली. यानंतर टिप्पर रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानात घुसला. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले. कारचा दरवाजा आदळल्याने कार चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर टपरी चालक आणि तीन ग्राहकांसह चार जण जखमी झाले.घटनेनंतर आरोपी टिप्पर चालक घटनास्थळावरून पळून गेला. अपघाताची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

या अपघातात टपरी चालक गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. कार टिप्परला धडकली. त्यामुळे कारचालक गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. चारही जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर अजुनही मृताची ओळख पटलेली नाही.मृत तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना क्रेन बोलवावी लागली. हा अपघात किती भीषण होता, यावरून समजू शकतो. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी टिप्परचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यावेळी घटनास्थळी मोठा जमाव जमला होता. त्यामुळे अपघातग्रस्तांना मदत करण्यात पोलिसांना अडथळा निर्माण झाला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला. पोलीस आरोपी टिप्पर चालकाचा शोध घेत आहेत.

  • Related Posts

    पुण्यात केमिकल मिश्रित ताडी पिल्याने २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू, महिला संतापल्या आणि…

    पुण्यात केमिकल मिश्रित ताडी पिल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याने संतप्त महिलांनी ताडी केंद्रावर तोडफोड केली. या घटनेने गावात तणाव निर्माण झाला असून, महिलांनी अवैध ताडी विक्री बंद करण्याची मागणी केली…

    वाल्मिक कराडला जेलमध्ये पॅनिक अटॅक, प्रकृती बिघडली, डॉक्टरांकडून तपासणी .

    मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड सध्या बीड मध्यवर्ती कारागृहात आहे. सीआयडीकडे त्याच्याविरुद्ध भक्कम पुरावे असल्याने त्याचा तुरुंगातील मुक्काम वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, कारागृहात…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    पुण्यात केमिकल मिश्रित ताडी पिल्याने २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू, महिला संतापल्या आणि…

    पुण्यात केमिकल मिश्रित ताडी पिल्याने २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू, महिला संतापल्या आणि…

    वाल्मिक कराडला जेलमध्ये पॅनिक अटॅक, प्रकृती बिघडली, डॉक्टरांकडून तपासणी .

    वाल्मिक कराडला जेलमध्ये पॅनिक अटॅक, प्रकृती बिघडली, डॉक्टरांकडून तपासणी .

    मुख्यमंत्रिपदावरुन चिमटे! बावनकुळेंच्या विधानानंतर भाजप-शिवसेनेची परस्परांना उद्देशून टोलेबाजी.

    मुख्यमंत्रिपदावरुन चिमटे! बावनकुळेंच्या विधानानंतर भाजप-शिवसेनेची परस्परांना उद्देशून टोलेबाजी.

    रजेवर गावी आलेल्या जवानावर काळाचा घाला, निवृत्तीच्या तोंडावर अपघाती निधन, सारं गाव हळहळलं.

    रजेवर गावी आलेल्या जवानावर काळाचा घाला, निवृत्तीच्या तोंडावर अपघाती निधन, सारं गाव हळहळलं.