मुख्यमंत्रिपदावरुन चिमटे! बावनकुळेंच्या विधानानंतर भाजप-शिवसेनेची परस्परांना उद्देशून टोलेबाजी.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०३४पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील, असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर २०३४पर्यंतच कशाला ते २०८० पर्यंत त्यांना मुख्यमंत्री राहू द्या, असा चिमटा शिवसेनेकडून काढण्यात आला.राज्यातील मुख्यमंत्रिपदावरून महायुतीमध्ये अधूनमधून नाराजीचा सूर आळवला जात असतानाच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०३४पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील, असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर २०३४पर्यंतच कशाला ते २०८० पर्यंत त्यांना मुख्यमंत्री राहू द्या, असा चिमटा शिवसेनेकडून काढण्यात आला. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर केवळ शुभेच्छा असे म्हटले.
राज्यातील महायुतीत आतून सर्वच काही आलबेल नाही, असे दर्शविणाऱ्या काही गोष्टी अधूनमधून प्रकर्षाने दिसतात. महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून झालेले नाट्य महाराष्ट्राने पाहिले होते. एकनाथ शिंदे अचानक त्यांच्या दरे या मूळ गावी गेले होते.

तिथून नंतर ते ठाण्यात आले. त्यानंतर दिल्लीतील बडे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याचे ठरवल्याचे समजते. मात्र त्यानंतरही महायुतीत पालकमंत्रिपदावरून टोकाचे वाद दिसले. असे असले तरी याविषयी जाहीरपणे भाष्य करण्याचे महायुतीमधील बड्या नेत्यांनी नेहमीच टाळले आहे.महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र २०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील, असे वक्तव्य करत नव्या वादाला तोंड फोडले. ‘विकसित महाराष्ट्र हा फडणवीस यांचा संकल्प आहे. फडणवीस मुख्यमंत्री असल्याशिवाय विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच आपल्याला पुढे जायचे आहे.

केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे डबल इंजिन सरकारच राज्याचा विकास, भले करू शकतात’, असे बावनकुळे म्हणाले.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता, त्यांनी हात जोडत नमस्कार केला आणि शुभेच्छा अशी एका शब्दात प्रतिक्रिया दिली. तर शिवसेना नेते रामदास कदम यांनी यावर बेधडक प्रतिक्रिया दिली. २०२४ कशाला ते २०८० पर्यंत मुख्यमंत्री राहू द्या, असा चिमटा त्यांनी काढला. पण त्याचवेळी आमच्यात कोणी भांडणे लावण्याचा प्रयत्न करत असेल तर तो यशस्वी होणार नाही, असे सांगायला ते विसरले नाहीत. दरम्यान बावनकुळे यांच्या या वक्तव्याने उलटसुलट चर्चांना मात्र उधाण आले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.