मी लग्न करतो, चल माझ्यासोबत’; पुण्यातील बुधवार पेठेत धक्कादायक प्रकार समोर, पोलिसाकडून अनैसर्गिक अत्याचार.

 पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका विवाहित महिलेला तिच्या सहा वर्षांच्या मुलीसह प्रियकराने वेश्याव्यवसायासाठी बुधवार पेठेत पाच लाखांना विकल्याचा आरोप आहे. या प्रकरणी प्रियकर शफीकल आलम, कुंटणखाना चालक पापा शेख आणि एका पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विवाहित प्रेयसीची तिच्या सहा वर्षाच्या मुलीसह बुधवार पेठेतील एका कुंटनखान्यात पाच लाख रुपयांत विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. विक्री केलेली महिला मूळची आसाम येथील असून, ‘तुझ्याशी लग्न करतो, असे सांगून प्रियकराने तिला पुण्यात आणले होते. या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात प्रियकर शफीकल आबूल नासूर याहीद आलम (रा. आसाम), कुंटणखाना चालक पापा शेख, अधुग शिवा कामली (दोघे रा. बुधवार पेठ) आणि पोलिस दलातील अनोळखी व्यक्ती यांच्यावर गुन्हा दाखळ करण्यात आला आहे या प्रकरणी २५ वर्षीय पोडितेने तक्रार दिली आहे हा प्रकार एक जानेवारी २०२५ या कालावधीत घडला आहे.या प्रकरणात पोलिस दलातील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे.

त्यात पीडितेच्या तक्रारीनुसार त्याची ओळख ‘डिबीवाला’ अशी नमूद करण्यात आलेली आहे. मात्र, ही व्यक्ती अधिकारी पदावरील व्यक्ती असल्याची सूत्रांची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शफोकल मूळचा आसाममधील आहे. पीडित तरुणी विवाहित असून, तिला एक मुलगी आहे. तिचा पती भाजी विक्रीचा व्यवसाय करतो, त्याला दारू आणि जुगाराचे व्यसन आहे. तो तिला त्रास द्यायचा, शफीऊलने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले त्याने तिला विवाहाचे आमिष दाखविले, तसेन पुण्यात कामाला लावतो असे सांगितले जानेवारी महिन्यात आसाममधून विमानाने पुण्यात आणले त्यानंतर बुधवार पेठेतील कुंटणखाना चालक पापा शेख याला पाच लाख रुपयात विकले,

तरुणीला धमकावून दलाल पापा शेख, अधुरा कामली यांनी वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले.आरोपींच्या ओळखीतील एका पोलिसाने तरुणीवर अनैसर्गिक अत्याचार केले. गेले चार महिने हा प्रकार सुरू होता. दरम्यान, तरुणी कामानिमित्त बाहेर पडली होती. बुधवार पेठेत तिची एका सामाजिक कार्यकत्यांची भेट इाली. तिने तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगाची माहिती त्याला दिली. समाजिक कार्यकत्यांने या प्रकाराला वाचा फोडली त्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.