‘ए…चावी का काढलीस?’ ओव्हरटेक केलं म्हणून गाडी थांबवली, तीच चूक तरुणाच्या जीवावर बेतली, नेमकं काय घडलं?

चाव्या काढल्यामुळे संतापलेल्या नीलेशने ट्रकमध्ये ठेवलेला धारदार चाकू काढून वंशवर सपासप वार केले. वंशचा सहकारी उत्कर्ष विरखेडे वाद मिटवण्यासाठी पुढे आला असता, त्याच्यावरही नीलेशने हल्ला चढवला. या हल्ल्यात उत्कर्ष जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.शहरातील गुन्हेगारी घटनांना आळा घालण्याचे प्रयत्न सुरु असतानाच नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी ओव्हरटेकिंगच्या किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेला. २५ वर्षीय वंश उर्फ अतुल डहारे याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोशहरातील गुन्हेगारी घटनांना आळा घालण्याचे प्रयत्न सुरु असतानाच नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी ओव्हरटेकिंगच्या किरकोळ वादातून एका तरुणाचा जीव गेला. २५ वर्षीय वंश उर्फ अतुल डहारे याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी नीलेश सहारे आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला अटक केली आहे.

चाकूने सपासप वार मिळालेल्या माहितीनुसार, वंश उर्फ अतुल डहारे वाडी परिसरात राहत होता आणि ट्रक चालक म्हणून काम करत होता. रविवारी वंश त्याचा सहकारी उत्कर्ष विरखेडे याच्यासोबत कामठी रोडवरून ट्रकचे वजन करून परत येत होता. दरम्यान, मध्य प्रदेशातील बालाघाट येथील रहिवासी आरोपी नीलेश सहारे आपल्या ट्रकसह त्यांना ओव्हरटेक करून पुढे गेला. यावरून वंश नाराज झाला आणि जरीपटका परिसरातील तथागत चौकाजवळ सिग्नलवर थांबले असता, वंशने नीलेशच्या ट्रकच्या चाव्या काढून घेतल्या. चाव्या काढल्यामुळे संतापलेल्या नीलेशने ट्रकमध्ये ठेवलेला धारदार चाकू काढून वंशवर सपासप वार केले. वंशचा सहकारी उत्कर्ष विरखेडे वाद मिटवण्यासाठी पुढे आला असता, त्याच्यावरही नीलेशने हल्ला चढवला.

या हल्ल्यात उत्कर्ष जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी वंशला तातडीने रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर जरीपटका पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि काही तासांतच आरोपी नीलेश सहारे आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला अटक केली. पोलिसांनी दोघांवरही हत्या आणि हत्येच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश सहारे याच्यावर यापूर्वीही काही किरकोळ गुन्ह्यांचे आरोप आहेत. सध्या पोलीस अधिक तपास करत असून, हत्येमागील इतर कोणतेही कारण आहे का, याचा शोध घेत आहेत. नागपूरमध्ये अलिकडच्या काळात किरकोळ वादातून होणाऱ्या हत्यांची मालिका सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दुसरीकडे, नागपूरच्याच अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोकुळपेठ परिसरातील ‘सोशा कॅफे’चे संचालक अविनाश राजू भुसारी (वय २८) यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांच्या गुन्हे शाखेने केलेल्या विशेष मोहिमेत बंटी उर्फ शैलेश विनोद हिरणवारसह पाच आरोपींना उत्तर प्रदेशातून अटक करण्यात आली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.