पुणे भाजपमध्ये मोठे बदल होणार असून, शहराध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. तीन नावांमध्ये एका महिलेचा समावेश असल्याने शहराध्यक्ष कोण होणार याकडे लक्ष लागले आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवीन शहराध्यक्षाची घोषणा होण्याची शक्यता असून इच्छुकांनी लॉबिंग सुरू केले आहे.भारतीय जनता पक्षामध्ये काही दिवसात मोठे संकटात्मक बदल होणार आहेत. प्रदेशाध्यक्षांपासून शहराध्यक्ष ते जिल्हाध्यक्षपर्यंत नवीन नियुक्त्या भारतीय जनता पक्षात करण्यात येणार आहेत. त्यासाठीच प्रत्येक जिल्ह्यात निरीक्षक नेमले आहेत. निरीक्षक नेमल्यानंतर पुणे शहरात काही दिवसांपूर्वी मंडल अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली होती. तर आता शहराध्यक्ष पदासाठी सुद्धा निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. यामध्ये प्रमुख तीन नाव शहराध्यक्ष पदासाठी सुचवण्यात आली आहेत. या तीन नावांमध्ये एक महिला असल्याचे देखील माहिती आहे. त्यामुळे पुणे शहराचा भाजपचा कारभारी कोण? बंद झाले असून मेच्या पहिल्या आठवड्यात नवीन शहराध्यक्ष घोषित होण्याची शक्यता आहे.










