नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी गावात भीषण अपघात झाला. कोळदा-खेतीया महामार्गावर एक कंटेनर थेट घरात घुसल्याने संजय ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला. जनाबाई ठाकरे गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात तीन ते चार घरांचे आणि काही वाहनांचे मोठे नुकसान झाले. शहादा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.नंदुरबार : कोळदा- खेतीया महामार्गावरील एक कंटेनर थेट ब्राह्मणपुरी गावातील रस्त्याच्याकडेला असलेल्या एका घरात घुसल्याने एक जण जागीच ठार तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. सदरची घटना 28 एप्रिल रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास घडली. घरातील ऐकमेव कर्तापुरुष गेल्याने कुटुंबीय आक्रोश केला.










