‘महाराष्ट्राची कुलस्वामिनी’ असलेल्या आई तुळजाभवानीचे ‘प्रति तुळजापूर’ हे मंदिर ठाण्यात उभारण्यात आले आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या मंदिरात त्यांनी स्वत: विधिवत पूजा केली.यावेळी ज्यांच्या संकल्पनेतून हे मंदिर साकारले असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) विधिमंडळ गटनेते जितेंद्र आव्हाड स्वतः पूजेत सहभागी झाले. भगवे वस्त्र परिधान करून आव्हाडांचे पूजाअर्चा करतानाचे फोटो समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहेत.तुळजाभवानीचे भव्य मंदिर दगडी खांब, उंचचउंच कळस, मंदिराच्या सभोवती गजमुख व प्रांगणात दगडी दीपस्तंभ असे हेमाडपंती शिल्पकलेचा अविष्कार असलेले तुळजाभवानीचे भव्य मंदिर ठाण्यात प्रत्यक्ष उभारले आहे. ‘महाराष्ट्राची कुलस्वामिनी’ .’महाराष्ट्राची कुलस्वामिनी’ अशी ओळख असलेल्या आई तुळजाभवानीचे हे ‘प्रति तुळजापूर’ मंदिर पाचपाखाडी येथील गणेशवाडी भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) विधिमंडळ गटनेते जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आले आहे.










