जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येतोय. दरम्यान, पहलगाम हल्ल्याबाबत सोशल मीडियावर मत व्यक्त केल्यानंतर गायक नेहा सिंग राठोड वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे नेहा राठोड विरोधात तक्रार दाखल करण्यात आलीये. अभय सिंह यांच्याकडून ही तक्रार दाखल करण्यात आलीये. दरम्यान, एफआयआर नोंद करण्यात आल्यानंतर नेहा सिंग राठोडने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राठोड यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 10 वेगवेगळ्या कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याशिवाय आयटी कायद्याचे कलम देखील जोडण्यात आले आहे.










