
पतीने इंजिनिअर पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी पतीने हत्येमागचं कारणही सांगितलं आहे.पत्नीच्या अफेअरच्या संशयातून पतीने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने पत्नीच्या डोक्यात हातोडा मारुन तिची हत्या केली. याप्रकरणी आरोपी पतीने दिलेल्या कबुलीने पोलिसही हैराण आहेत.शुक्रवारी नोएडामधील सेक्टर १५ मध्ये पतीने पत्नीच्या डोक्यात हातोडा मारला. त्यानंतर पत्नी बेशुद्ध पडली. पत्नी बेशुद्ध पडल्यानंतर पतीने तिच्या गळ्यावर चाकू मारुन तिची हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती पोलीस स्टेशनला पोहोचला आणि पोलिसांकडे त्याने केलेल्या गुन्हाची कबुली दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोलिसांच्या टीमसह फॉरेंसिक टीमदेखील दाखल झाली आणि घटनेचा तपास सुरू केला. याप्रकरणी या दाम्पत्याच्या मुलाच्या तक्रारीवरुन वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेत तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
शवविच्छेदन अहवालात पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, सुरुवातीला आरोपी पतीने पत्नीच्या डोक्यात हातोडा मारला. या हल्ल्यात पत्नी कोमामध्ये गेली. त्यानंतर पतीने तिचा गळा कापून तिला पूर्ण ठार केलं.पत्नी आसमा सिव्हिल इंजिनिअर होती. ती नोएडामधील पॉश भागात प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत होती. पत्नीचं बाहेर अफेअर असल्याचा पतीला संशय होता. ती सतत फोनवर बोलायची. तिला अनेकदा फोनवर जास्त न बोलण्याचं सांगायचा. पत्नीला सतत वेगवेगळ्या नंबरवरुन कॉल यायचे यातूनच तिच्यावर अफेअर असल्याचा संशय होता. दोघांमध्ये यावरुन सतत वाद होत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, इंजिनिअर असलेल्या पत्नीचा आरोपी पती कोणतंही काम करत नव्हता. तो मागील १० वर्षांपासून बेरोजगार होता.मृत महिलेची ओळख आसमा खान, वय वर्ष ४२ अशी पटली असून आरोपी पतीचं नाव नुरुल्लाह हैदर, वय वर्ष ५५ आहे. मृत महिलेच्या मुलीने आपल्या आई-वडिलांमध्ये सतत भांडणं होत असल्याचं त्यांच्या नातेवाईकांना कळवलं होतं. पण यातून इतकं भयंकर घडेल याची कोणालाही कल्पना नव्हती. संशयाचं भूत डोक्यात गेलं आणि एक चौकोनी कुटुंब अत्यव्यस्त झालं. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून दोन मुलांना त्यांच्या मावशीकडे पाठवण्यात आलं आहे.
Video Player
00:00
00:00