
रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या माणगाव येथील ग्रामीण रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे इयत्ता सातवीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहेवेळीच उपचार न मिळाल्याने एका बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात शाळकरी मुलासोबत हा हृदयद्रावक प्रकार घडला. या घटनेमुळे कुटुंब आणि मित्र परिवार शोकसागरात बुडाले आहेत. पायावर झालेल्या बारीकशा केसतोडीनंतर आलेल्या तापाने त्याचा जीव घेतल्याची माहिती आहे.रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या माणगाव येथील ग्रामीण रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे इयत्ता सातवीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. गर्वांग दिनेश गायकर असं १४ वर्षीय मयत मुलाचं नाव आहे. आपल्या लेकाचा नाहक बळी गेला असल्याचा आरोप गर्वांगच्या नातेवाईकांसह घूम ग्रामस्थांनी केला आहे.
रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील घूम गावात राहणाऱ्या गर्वांग दिनेश गायकर याच्या पायावर केस पुळी आली. त्याला शुक्रवारी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रात्री १०:३० वाजताच्या सुमारास पुन्हा म्हसळा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.गर्वांग याला ताप जास्त प्रमाणात असल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले आणि त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. पुढील उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्वांगला त्याच वेळी रात्री १ वाजे पर्यंत माणगाव रुग्णालयात उपचारासाठी नेले.माणगाव येथील कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी यांनी गर्वांग दिनेश गायकर याला नुसतीच बारीकशी केसपुळी झाली आहे. यावेळी ताप येतो, एवढ्या छोट्या गोष्टीचा गाजावाजा करत १०८ ची रुग्णवाहिका मोफत भेटते म्हणून कशाला आणायची? म्हसळच्या डॉक्टरांना काही समजत नाही का?