पायावर केसतोड आणि ताप, १४ वर्षांच्या गर्वांगचा करुण अंत, डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्याचा कुटुंबाचा दावा.

रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या माणगाव येथील ग्रामीण रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे इयत्ता सातवीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहेवेळीच उपचार न मिळाल्याने एका बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात शाळकरी मुलासोबत हा हृदयद्रावक प्रकार घडला. या घटनेमुळे कुटुंब आणि मित्र परिवार शोकसागरात बुडाले आहेत. पायावर झालेल्या बारीकशा केसतोडीनंतर आलेल्या तापाने त्याचा जीव घेतल्याची माहिती आहे.रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या माणगाव येथील ग्रामीण रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे इयत्ता सातवीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप होत आहे. गर्वांग दिनेश गायकर असं १४ वर्षीय मयत मुलाचं नाव आहे. आपल्या लेकाचा नाहक बळी गेला असल्याचा आरोप गर्वांगच्या नातेवाईकांसह घूम ग्रामस्थांनी केला आहे.

रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील घूम गावात राहणाऱ्या गर्वांग दिनेश गायकर याच्या पायावर केस पुळी आली. त्याला शुक्रवारी म्हसळा ग्रामीण रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रात्री १०:३० वाजताच्या सुमारास पुन्हा म्हसळा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.गर्वांग याला ताप जास्त प्रमाणात असल्याने डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केले आणि त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. पुढील उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्वांगला त्याच वेळी रात्री १ वाजे पर्यंत माणगाव रुग्णालयात उपचारासाठी नेले.माणगाव येथील कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी यांनी गर्वांग दिनेश गायकर याला नुसतीच बारीकशी केसपुळी झाली आहे. यावेळी ताप येतो, एवढ्या छोट्या गोष्टीचा गाजावाजा करत १०८ ची रुग्णवाहिका मोफत भेटते म्हणून कशाला आणायची? म्हसळच्या डॉक्टरांना काही समजत नाही का?

असे बोलून उपचार न करता त्याला घरी पाठवले, असे गर्वांगच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले आहे.रविवारी दिनांक ६ एप्रिल रोजी पहाटे ८ वाजता गर्वांग घरी पोहचताच त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. डॉक्टरांनी गर्वांगला उपचारासाठी ठेवले असते, तर तो सर्वांसोबत असता अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. गर्वांगवर उपचार न करणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा दाखल करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी केली आहे.म्हसळा तालुक्यात परिपूर्ण उपचार मिळत नाही, हे तालुक्यातील जनतेला मिळालेला शाप आहे. हा प्रकार पहिल्यांदाच घडला नसून अनेक प्रकार तालुक्यात घडलेले आहेत आणि घडत आहेत. केवळ इमारती सुसज्ज बांधून त्याच्यात उपचार होत नसतील, तर त्या इमारतीला करायचं काय? केवळ शोबाजी करून आरोग्य सेवेच्या नावावर राजकारण करीत असतील, तर अशा राजकारणांना कराव काय? असे एक ना अनेक प्रश्न तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला भेडसावत आहेत.

  • Related Posts

    सौ. ज. ग. पुर्णपात्री ज्यु. कॉलेजमध्ये श्रावणी निलेश पाटील हिला द्वितीय क्रमांक.

    भडगाव येथील प्रतिष्ठित सौ. जयश्री गणेश पुर्णपात्री ज्युनिअर कॉलेजमध्ये झालेल्या HSC बोर्ड वार्षिक परीक्षेमध्ये श्रावणी निलेश पाटील हिने ८६.१७% गुण मिळवून उल्लेखनीय यश मिळवत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. याआधी, २०२३…

    राफेलची ‘लिंबू-मिरची’ कधी काढणार? काँग्रेस नेते अजय राय यांच्या टिप्पणीनंतर वाद.

    राय यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी भाजपने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मात्र, वाद निर्माण झाल्यानंतरही राय त्यांच्या विधानांवर ठाम राहिले.जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणावाची…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    सौ. ज. ग. पुर्णपात्री ज्यु. कॉलेजमध्ये श्रावणी निलेश पाटील हिला द्वितीय क्रमांक.

    सौ. ज. ग. पुर्णपात्री ज्यु. कॉलेजमध्ये श्रावणी निलेश पाटील हिला द्वितीय क्रमांक.

    राफेलची ‘लिंबू-मिरची’ कधी काढणार? काँग्रेस नेते अजय राय यांच्या टिप्पणीनंतर वाद.

    राफेलची ‘लिंबू-मिरची’ कधी काढणार? काँग्रेस नेते अजय राय यांच्या टिप्पणीनंतर वाद.

    पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी शेतकऱ्यांनीच द्यावी ‘ऑफर’, अन्यथा १५ दिवसांनी…, महसूलमंत्री नेमकं काय म्हणाले?

    पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी शेतकऱ्यांनीच द्यावी ‘ऑफर’, अन्यथा १५ दिवसांनी…, महसूलमंत्री नेमकं काय म्हणाले?

    भटक्या कुत्र्याचा ७ वर्षीय मुलीला चावा; प्रतिबंधक लस घेऊनही रेबीजने मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं हे कारण.

    भटक्या कुत्र्याचा ७ वर्षीय मुलीला चावा; प्रतिबंधक लस घेऊनही रेबीजने मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं हे कारण.