“कुठेय तो..बोलवा त्याला..” भर बाजारात गोळीबार करत टोळक्याचा धुमाकूळ, चॉपरच्या हल्ल्यात एकाचा नाहक बळी.

गुरुवारी रात्री मानकापूर आठवडी बाजारात गर्दीच्या वेळी तीन आरोपींनी सोहेल खानवर धारदार चॉपरने वार केले. हत्या करताना बाजारात लोकांची मोठी गर्दी असताना आरोपींनी कोणतीही भीती न बाळगता गुन्हा केला. त्यानंतर घटनास्थळावरून आरोपी बेधडकपणे पळून गेले. यातील एकाने बाजारात हवेत गोळ्या झाडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भिती पसरली. लोकांनी जीव वाचवण्यासाठी इथून तिथे धावाधाव केली. शहरातील मानकापूरपोलीस ठाण्याच्या हद्दीत झिंगाबाई टाकळी परिसरात गुरुवारी रात्री घडलेली हत्या परिसरात मोठी खळबळ उडवणारी ठरली. रात्री सुमारे ९ वाजता, मानकापूर आठवडी बाजारात लोकांनी गर्दी केलेल्या ठिकाणी काही गुन्हेगारांनी थेट गोळीबार करत एका युवकाची निर्घृण हत्या केली. मृतक युवकाचे नाव सोहेल खान (वय ३५) असे असून, तो प्रकाश नगर परिसरातील रहिवासी होता. पाच जणांच्या टोळीने बाजारात शस्त्रांसह प्रवेश केला आणि “शाहरुख कुठे आहे?” असे विचारत अचानक गोळीबार सुरू केला.

यावेळी काही आरोपींनी चॉपरने वार करत सोहेल खानवर हल्ला केला. या हल्ल्यात सोहेलचा जागीच मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले.गुरुवारी रात्री आठवडी बाजारात गर्दीच्या वेळी तीन आरोपींनी सोहेल खानवर धारदार चॉपरने वार केले. हत्या करताना बाजारात लोकांची मोठी गर्दी असताना आरोपींनी कोणतीही भीती न बाळगता गुन्हा केला. त्यानंतर घटनास्थळावरून आरोपी बेधडकपणे पळून गेले. यातील एकाने बाजारात हवेत गोळ्या झाडल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भिती पसरली. लोकांनी जीव वाचवण्यासाठी इथून तिथे धावाधाव केली. बाजारात अफरातफरीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत धीरज घोडमारे, राजेंद्र मरकाम आणि भूषण या तीन आरोपींना अटक केली असून चौथा आरोपी चंदू डोंगरे अद्याप फरार आहे.

त्याचा शोध सध्या सुरू आहे.या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून, काही युवकांनी घोषणाबाजी करत दुचाकींवर तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. यानंतर मेयो रुग्णालयासमोरही जमाव जमा झाला होता. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. भाजीच्या ठेल्यावरून झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. काहिच दिवसांपूर्वी नागपुरात हिंसाचार उसळला होता. त्यानंतर तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आली होती. मुख्यमंत्र्यांचे शहर आणि राज्याची उपराजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपुरात गुंडांना कायद्याचे भय राहिले आहे की नाहि? असा संतप्त सवाल या हत्याकांडानंतर नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

  • Related Posts

    धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईची लाज गेली, मोठी नामुष्की, IPLच्या इतिहासात हे कधीच घडलं नव्हतं.

    चेन्नईच्या संघाची धोनीच्या नेतृत्वाखाली लाज गेल्याचे पाहायला मिळाले. कारण आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत कोणती गोष्ट यापूर्वी कधीच घडलेली नव्हती, जाणून घ्या…महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली आता चेन्नई सुपर किंग्स संघावर सर्वात मोठी नामुष्की…

    रेल्वेचे नागपूरला ९०३ कोटी! मुख्य स्थानकाला ५८९ तर अजनीला २९७; ‘या’ स्थानकांचाही होणार कायापालट.

     या प्रकल्पांतर्गत नागपुरातील मुख्य रेल्वेस्थानकाला ५८९ कोटी, अजनी रेल्वे स्थानकासाठी २९७कोटी आणि इतवारी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस स्थानकाला १७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले.भारतीय रेल्वेच्या ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेंतर्गत महाराष्ट्रातील…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईची लाज गेली, मोठी नामुष्की, IPLच्या इतिहासात हे कधीच घडलं नव्हतं.

    धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईची लाज गेली, मोठी नामुष्की, IPLच्या इतिहासात हे कधीच घडलं नव्हतं.

    रेल्वेचे नागपूरला ९०३ कोटी! मुख्य स्थानकाला ५८९ तर अजनीला २९७; ‘या’ स्थानकांचाही होणार कायापालट.

    रेल्वेचे नागपूरला ९०३ कोटी! मुख्य स्थानकाला ५८९ तर अजनीला २९७; ‘या’ स्थानकांचाही होणार कायापालट.

    महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे प्रबोधन सप्ताहाचा आजचा पाचवा दिवस.

    महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीतर्फे प्रबोधन सप्ताहाचा आजचा पाचवा दिवस.

    काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांना अटक, बिहारमध्ये सुरू होती पदयात्रा, ताब्यात घेण्याचं कारण काय?

    काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांना अटक, बिहारमध्ये सुरू होती पदयात्रा, ताब्यात घेण्याचं कारण काय?