अचानक चक्कर येऊन कोसळल्या अन् क्षणात सारं संपलं, साताऱ्यात महिला पोलिसाचा हार्ट अटॅकने मृत्यू.

साताऱ्यात एका महिला पोलिसाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. या महिला पोलिसाला चक्कर आल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिथे तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.साताऱ्यात एका महिला पोलिसाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. येथे कोयना बिनतारी संदेश यंत्रणा विभागात कार्यरत असणाऱ्या सत्वशीला सुहास पवार (वय ३७, रा. सातारा) या महिला पोलिस कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना साताऱ्यातील मलकापुरात गुरुवारी (३ एप्रिल) घडल्याची माहिती आहे.
गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास सत्वशीला पवार यांना चक्कर आली. त्यामुळे त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.

कऱ्हाड तालुक्यातील शहापूर हे माहेर आणि सातारा हे सासर असलेल्या सत्वशीला पवार या गेल्या वर्षीपासून कराड शहर पोलिस ठाण्यात कार्यरत होत्या.सद्यस्थितीत त्या कोयना बिनतारी संदेश यंत्रणा विभागात प्रतिनियुक्तीवर कर्तव्य बजावत होत्या, अशी माहिती आहे.यापूर्वी त्यांनी उपअधीक्षक कार्यालयात प्रतिनियुक्तीवर कर्तव्य बजावले होते. त्या मलकापूरमध्ये वास्तव्यास होत्या. आज सकाळी सातच्या सुमारास याच ठिकाणी त्यांना अचानक चक्कर आली. त्यानंतर त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयात जाहीर करण्यात आले.

या दुर्दैवी घटनेनंतर त्यांची उत्तरीय तपासणी येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली.त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. साताऱ्यातील संगममाहुली येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शहर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक वंदना श्रीसुंदर, सहायक पोलिस निरीक्षक श्रद्धा आमले, तब्बसुम शादीवान, सरिता जाधव यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. साताऱ्यातील क्षेत्र माहुली येथील स्मशानभूमीत पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.