राज्यभरात अवकाळीचा तडाखा! ‘या’ जिल्ह्यांतील हजारो हेक्टर पिके भुईसपाट, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान.

विदर्भात वीज पडून शेतकऱ्यासह तीन जणांचा मृत्यू झाला. नंदुरबारमध्ये बुधवारी झालेल्या पावसामुळे २५ घरांची पडझड झाली.राज्यात नाशिक, धुळ्यासह विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत गुरुवारी अवकाळीने तडाखा दिला. धुळे जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यात ठिकठिकाणी शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे.साक्री तालुक्यात पश्चिम पट्ट्यातही पाऊस झाला. विदर्भात भंडारा, यवतमाळ, बुलढाणा जिल्ह्यांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली, तर मराठवाड्यात वैजापूर तालुक्यात पिकांचे नुकसान झाले. विदर्भात वीज पडून शेतकऱ्यासह तीन जणांचा मृत्यू झाला. नंदुरबारमध्ये बुधवारी झालेल्या पावसामुळे २५ घरांची पडझड झाली.नाशिक : जिल्ह्यातील अनेक भागांत अवकाळी पावसाने गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी हजेरी लावली.

चांदवड तालुक्यात गारपिटीने तडाखा दिला, तर निफाड तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. देवळा तालुक्यात पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मनमाड परिसरातही हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. त्र्यंबकेश्वर तालुक्यातही पावसामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले.बुलढाणा जिल्ह्यातील आठ तालुक्यांना वादळी पाऊस, गारपिटीचा तडाखा बसला. सिंदखेडराजा तालुक्यातील शेंदुर्जना येथील नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयाचे छत उडाले. यामुळे शाळेच्या मैदानावर क्रिकेट खेळणारा एक विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.

अवकाळी पावसासोबत वीज कोसळून भंडारा जिल्ह्यातील दोन, तर यवतमाळ जिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील पाथरी येथे मनीषा भारत पुष्पतोडे (वय ३२) व प्रमोद मणिराम नागपुरे (४२, दोघेही रा. पाथरी), तर यवतमाळ जिल्ह्यात वसंत नरसिंग चव्हाण (वय ४०) या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला.गेल्या दोन दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. संगमनेर, अकोले तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने गहू, बाजरी, कांदा या पिकांचे नुकसान झाले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.